पूर्व हवेलीत मध्यम स्वरुपाचा पाऊस ; उकाड्याने मिळणार संरक्षण तर शेतीची पाण्याची चिंता काहीशी कमी

उरुळी कांचन : पूर्व हवेलीत भागात पावसाला सुरुवात झाली आहे. पूर्व हवेलीत मागील काही दिवसांपासून वातावरणात बदल होत होते. कधी ऊन, वारा तर कधी पाऊस असा लपंडाव सारखाच सुरु होता. येथील वातावरण ढगाळ झाल्यामुळे तापमानाचा पारा खाली गेला होता.
यामुळे नागरिकांचे उकाड्याने मोठे हाल झाले होते. या पडलेल्या पाऊसामुळे उकाड्यापासून हैराण झालेल्या नागरिकांना थोडाफार दिलासा मिळाला आहे. पावसामुळे शेतीची पाण्याची चिंता काहीशी कमी होणार आहे.
राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्याचा व पावसाचा अंदाज सांगण्यात आला होता. सोलापूर, बीड, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, लातूर, नांदेड, बुलढाणा, वाशिम, अहमदनगर, नाशिक, पुणे, सातारा, अकोला, यवतमाळ, अमरावती, वर्धा, चंद्रपूर, मुंबई, रायगड या जिल्ह्यामध्ये पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
Views:
[jp_post_view]