ओडिशात रेल्वे अपघातात मृतांचा आकडा २३३ वर, ९०० पेक्षा अधिक जखमी
ओडिशा: काल रेल्वे अपघाताबाबत एक मोठी घटना घडली. ओडिशातील बालासोर जिल्ह्यात भीषण रेल्वे अपघात झाला. यामुळे एकच खळबळ उडाली. येथे बहनगा रेल्वे स्थानकाजवळ तीन गाड्या एकमेकांवर धडकल्या.
या रेल्वे अपघातात २३३ लोकांचा मृत्यू झाला असून ९०० हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. सध्या घटनास्थळी मदतकार्य सुरू आहे. मृतांचा आकडा आता वाढू शकतो.
हावडा- बेंगळुरू एक्स्प्रेसचे अनेक डबे संध्याकाळी ७ वाजता रुळावरून घसरले. हे बडे ओडिशातील बहंगाबाजार येथे लगतच्या ट्रॅकवर पडले. १२८४१ शालीमार-चेन्नई सेंट्रल कोरोमंडल एक्स्प्रेस त्या रुळावर आली आणि उलटलेल्या डब्यांशी धडकली.
यामुळे कोरोमंडलचे अनेक डबे रुळावरून घसरले आणि लगतच्या रुळावरून जाणाऱ्या मालगाडीला धडकले. स्थानिक लोकांनी प्रवाशांना बाहेर काढण्यास सुरुवात केली. नंतर एन.डी.आर.एफ. राज्य सरकार आणि लष्कराने मदतकार्य सुरू केले.
या घटनेमुळे राज्यात एक दिवसाचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे.
ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त केले. सध्या जखमींवर उपचार सुरू आहेत.