वडिलांनी नवीन मोबाईल घेण्यास नकार दिला; १८ वर्षीय मुलाचा संताप अनावर अन् घडली दुर्दैवी घटना, वसईत खळबळ


नालासोपारा : आपल्या मुलांनी सुखात आणि आनंदात राहावे, अशी प्रत्येक पालकांची इच्छा असते. मुलांचे हट्ट पूर्ण करण्याचा पालक प्रयत्न करतात. मात्र, प्रत्येक वेळी मुलांची मागणी पूर्ण करणे शक्य होत नाही. अशाच एका कौटुंबिक प्रसंगातून नालासोपाऱ्यात दुर्दैवी घटना घडली आहे.

वडिलांनी नवीन मोबाईल घेऊन देण्यास नकार दिल्याने १८ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. ही घटना नालासोपारा येथील वाकणपाडा परिसरात शनिवारी घडली. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित तरुणाने वडिलांकडे नवीन मोबाईलची मागणी केली होती.

मात्र, काही कारणास्तव वडिलांनी त्याची मागणी पूर्ण करण्यास नकार दिला. यावरून तरुण नाराज झाला होता. त्यानंतर घरात घडलेल्या दुर्दैवी प्रकारामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला.

घटनेची माहिती मिळताच कुटुंबीयांनी त्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्याला मृत घोषित केले.

दरम्यान, या घटनेची नोंद पेल्हार पोलिसांनी केली असून, पुढील तपास सुरू आहे. दिवाळीच्या सणादरम्यान घडलेल्या या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!