दुर्दैवी! दिवाळी सणाला हॉटेलमधून पार्सल जेवण आणायला गेलेल्या भाऊ-बहिणीला कारची धडक; भाऊ ठार, बहीण अत्यंत गंभीर जखमी; कारचालकही ठार; उरुळीकांचन येथील घटनेने परिसरात हळहळ…

उरुळी कांचन : दिवाळी सण साजरा करताना कुटूंबियांना जेवणाचे पार्सल हॉटेलमधून घेऊन येत असताना भरधाव कारने दुचाकीला समोरासमोर जबर धडक दिल्याने कारच्या धडकेने दुचाकीस्वार हवेत उडून रस्त्यावर आदळून जागेवर मृत्यू तर कार चालकाचा कारने धडकून मृत्यू झाल्याची घटना पुणे-सोलापूर महामार्गावर उरुळीकांचन येथे रविवार (दि. 8) रोजी रात्री सव्वानऊच्या सुमारास साखरे पेट्रोलपंपाजवळ घडली आहे. .

या अपघातात दुचाकीस्वार नयन नितीन हजारे (वय 19, रा. उरुळीकांचन, तुपेवस्ती) आणि तर कारचालक तुषार उर्फ अमर रोहिदास कुंजीर (वय 23, रा. वळती, ता. हवेली) अशी मृतांची नावे आहेत. तर दुचाकीवर पाठिमागे बसलेली तन्वी नितीन हजारे (वय १६) ही या अपघातात गंभीर जखमी झाली आहे.
तिच्यावर पुण्यात खाजगी वेरणा कार एम एच 12 पिटी 9089 ने दुचाकीला समोरच जोरदार धडक दिली. धडक इतकी भयंकर होती की दुचाकीस्वार हवेत उडून रस्त्यावर फेकला गेला व रस्त्यावर आपटून जागीच ठार झाला.

तर वेरणा चालक दुचाकीला धडक देऊन वाहनाचे नियंत्रण सुटुन रस्त्यालगत झाडावर आदळला गेल्याने कारचालक तुषार उर्फ अमर कुंजीर हा जागीच ठार झाला आहे. तर तन्वीला गंभीर अवस्थेत पुण्यात खाजगी रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे.

या प्रकरणी नयन यांचे काका जितेंद्र नागनाथ हजारे यांनी उरुळीकांचन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक तारडे करीत आहेत.
