पुणे महापालिकेतील ३२० पदांच्या भरतीसाठी १० हजार अर्ज, भरतीची तारीख जाहीर…

पुणे : महापालिकेच्या वर्ग एक ते वर्ग तीन संवर्गातील रिक्त ३२० पदे सरळसेवा प्रवेशाने भरण्यात येणार आहेत. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

या परीक्षेच्या संभाव्य तारखा महापालिका प्रशासनाकडून जाहीर करण्यात आल्या आहेत. २२ जून आणि २ जुलै रोजी परीक्षा तीन सत्रात होणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांनी याकडे लक्ष देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मटण केले नाही म्हणून पतीकडून पत्नीच्या डोक्यात विळ्याने वार; पुण्यातील धक्कादायक घटना

क्ष किरण तज्ज्ञ, रेडिओलॉजिस्ट, वैद्यकीय अधिकारी, निवासी वैद्यकीय अधिकारी, उपसंचालक, पशुधन पर्यवेक्षक, कनिष्ठ अभियंता, अग्निशमन विमोचन आणि फायरमन या पदासाठी २२ जुलै रोजी परीक्षा होणार आहे.

भरदिवसा घरफोडया करणाऱ्या चोरट्यांना लोणी काळभोर पोलिसांनी ठोकल्या बेड्या; ४ लाखाचा मुद्देमाल जप्त
तसेच इतर पदासाठी २ जुलै रोजी परीक्षा होणार आहे. या पदांसाठी १० हजार १७१ अर्ज प्रशासनाकडे प्राप्त झाले असून ३२० जागांची भरती करण्यात येणार आहे.
LPG गॅसच्या दरांत घट, सिलेंडर 83.5 रुपयांनी स्वस्त, महागाईत मोठा दिलासा
उमेदवारांना परीक्षेच्या सात दिवस आधी परीक्षा प्रवेशपत्र उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासाठी उमेदवारांना भ्रमणध्वनी लघुसंदेश आणि ई-मेलद्वारे माहिती पाठविण्यात येणार आहे. महापालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावरून प्रवेशपत्र मिळविता येणार आहे.