मटण केले नाही म्हणून पतीकडून पत्नीच्या डोक्यात विळ्याने वार; पुण्यातील धक्कादायक घटना

पुणे : मटण न केल्याने दारु पिऊन घरी आलेल्या पतीने पत्नीच्या डोक्यात विळ्याने वार केल्याची घटना येरवड्यातील सुभाषनगर भागात घडली. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

भरदिवसा घरफोडया करणाऱ्या चोरट्यांना लोणी काळभोर पोलिसांनी ठोकल्या बेड्या; ४ लाखाचा मुद्देमाल जप्त
या प्रकरणी पती संदीप विष्णू मोरे (वय ३३, रा. सुभाषनगर, येरवडा) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाग्यश्री संदीप मोरे (वय २९) असे गंभीर जखमी झालेल्या पत्नीचे नाव आहे. तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

ठरलं! दहावीचा निकाल उद्या 1 वाजता होणार जाहीर; या वेबसाइटवर मिळेल संपूर्ण माहिती
मिळालेल्या माहिती नुसार, आरोपी संदीप मोरे मध्यरात्री दोनच्या सुमारास दारु पिऊन घरी आला. मटण न केल्याने तो पत्नीवर चिडला. त्याने पत्नीसह आई-वडिलांना शिवीगाळ केली.
अंबानी कुटूंबात आली छोटीशी लक्ष्मी, मुकेश अंबानी झाले आजोबा
त्यानंतर त्याने पत्नीच्या डोक्यात मासे कापण्याच्या विळ्याने वार केला. गंभीर जखमी झालेल्या पत्नीला रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.