मित्रांनो व्हाट्सअँप ग्रुपवर व्यक्त होताना काळजी घ्या! बारामतीत व्हाट्सअँप ग्रुपवर पोलिसांची कारवाई

बारामती : सध्या सोशल मीडिया वापरणे अवघड झाले आहे. याबाबत काळजी घेणे गरजेचे आहे. आतामुस्लिम समाजाविषयी जातीय तेढ होईल असे शब्द वापरून पोस्ट केल्याबद्दल पणदरे पंचक्रोशी व्हाटसएप ग्रुपचे अडमीन आणि संबंधित पोस्ट करणारे सतीश दळवी यांना माळेगाव पोलिसांनी समजपत्र बजावले आहे. त्यांना आता चौकशीसाठी बोलावले आहे.

पणदरेमध्ये व्हाटसएप ग्रुपमध्ये गावच्या परिसरात व्यक्ती समाविष्ट आहेत. यावर नेहमीच परिसराच्या विकासासाठी गरजेची चर्चा सुरु असते. मुळचे बारामतीचे पण सध्या कोल्हापूर येथे असणाऱ्या सतीश दळवी यांना काही दिवसापूर्वी या ग्रुपमध्ये समाविष्ट करण्यात आले.
सतीश दळवी हे योगशिक्षक असल्याने ते त्यासंबंधीची माहिती या ग्रुपवर शेअर करतील अशी अपेक्षा होती. मात्र त्यांनी मुस्लीम समाजाविषयी आपत्तीजनक मजकूर या ग्रुपवर टाकला, अशी माहिती ग्रुप अडमीन विक्रम जगताप यांनी दिली.

यामुळे आता चौकशी होणार आहे. माळेगाव पोलिसांनी याप्रकरणी कारवाईस सुरुवात केली आहे. यामुळे सोशल मीडियाचा वापर जपून करणे आवश्यक आहे.