पुण्यात भयंकर प्रकार! भर रस्त्यात सर्वांसमोर तरुणीसोबत नको ते कृत्य, मुलीला थेट…


पुणे : गेल्या काही दिवसांपासून पुणे शहारत अनेक गुन्हेगारीच्या घटना घडत आहेत. आता येथील कात्रज-कोंढवा रोडवरील सुखसागरनगर परिसरात 18 वर्षीय तरुणीची छेडछाड करून तिला उचलून नेण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यामुळे महाराष्ट्राचा बिहार होतोय का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

याठिकाणी उपस्थित असलेल्या नागरिकांच्या प्रसंगावधामुळे मोठा अनर्थ टळला आहे. नागरिकांनी आरोपीला चांगलाच चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले. समर्थ डेअरीसमोर मैत्रिणीची वाट पाहत थांबलेल्या तरुणीला आरोपीने नको त्याठिकाणी हात लावून शर्ट ओढत उचलल्याचा आरोप आहे. तरुणीच्या आरडाओरडीनंतर मैत्रीण आणि स्थानिक नागरिक मदतीला धावले.

जितु किशोरीलाल सरोज (वय 30, मूळ रा. उत्तर प्रदेश) असे आरोपीचे नाव आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज आता समोर आले आहे. हे सीसीटीव्ही फुटेज धक्कादायक आहे. यानिमित्ताने पुण्यातील गुन्हेगारी आणि ढासळत्या कायदा-सुव्यवस्थेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. नागरिकांनी आरोपीला पकडून मारहाण केली.

यावेळी त्याने एका व्यक्तीचा मोबाईल जमिनीवर फेकून फोडल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून, भारती विद्यापीठ पोलीस तपास करत आहेत. याबाबत तपासात अजून माहिती समोर येईल. मुलगी साडेसहाच्या सुमारास सुखसागर परिसरात समर्थ डेअरीसमोर मैत्रिणीची वाट पाहत थांबली होती.

तो माझ्या शेजारुन फिरला आणि मला डायरेक्ट उचलून नेण्याचा प्रयत्न केला. तेवढ्यात माझी मैत्रीण तिकडे आली. तिने त्याला ढकललं, तेव्हा मी खाली पडले. पडल्यावर मला हाताला लागले. तरीही तो माझ्या मैत्रिणीला ढकलून मला उचलून घेऊन जाण्याचा प्रयत्न करत होता. नंतर तिथे लोक जमा झाले. त्यांनी त्याला अडवण्याचा प्रयत्न केला, मात्र तो त्यांनाही मारायचा प्रयत्न करत होता, असेही मुलीने सांगितले.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!