उरुळीकांचन पोलिस ठाण्याच्या हद्दीत बदमाशांचा उच्छाद! पोलिसांवर उठलेले हात महामार्गावर गाड्या फोडण्यावर पोहचले! वर्दीचा धाकच संपलाय …!!


उरुळीकांचन : बदमाश लोकांचा उच्छाद वाढल्याने उरुळीकांचन पोलिस ठाण्याच्या हद्दीत कायदा व सुव्यवस्थेचा
धाक उरलाय काय असा प्रश्न पोलिसांच्या कार्यक्षमतेवरुन उपस्थित होऊ लागला असून बदमाश लोकांचा उच्छाद पोलिसांच्या वर्दीवर हात घालण्यासह माहामार्ग रोखून धरणे, वाहने फोडणे तसेच बुलेट वाहनांचा काढणे,महिलांना असुरक्षितता भासणे अशा स्तरावर गेल्याने या भुरट्यांचा बंदोबस्त खाकीत ताकद उरली नाही काय ? असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.

उरुळीकांचन पोलिस ठाण्याच्या हद्दीत नागरीकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने व कायद्याचे पालन होण्याच्या दृष्टीने कायदा सुव्यवस्थेवर पोलिसांची पकड शिल्लक आहे का असाप्रश्न आता त्यांच्या कृतीने दिसू लागला आहे. ‘सदक्षणाय खलनिद्रणाय’ हे पोलिसांचे ब्रीद वाक्य कायदा व सुरक्षितता आबाधित ठेवण्यासाठी आहे की ,पोलिसांना या कर्तव्याचा विसर पडलाय असा प्रश्न येथे निर्माण झालेल्या कायद्याच्या नसलेल्या धाकाने दिसून आला आहे.

उरुळीकांचन परिसरात वाढती लोकसंख्या गृहीत धरता या ठिकाणी मुबलक गावांचा सामावेश करुन स्वतंत्र पोलिस ठाण्याला गृह विभागाने मंजूरी दिली आहे.कायदा व्यवस्था अबाधित रहावी, नागरीकांची सुव्यवस्थेसाठी पोलिस बळ तसेच
गुन्ह्यांची संख्या कमी व्हावी म्हणून पोलिस ठाण्याची निर्मिती झाली. आकाराने मर्यादीत असलेल्या क्षेत्रालाही पोलिस ठाण्याचा दर्जा मिळून आतापर्यंत मंजूर पदांपैकी ६० मनुष्यबळाचे अधिकारी व कर्मचारी असे संख्याबळ या पोलिस ठाण्याला लाभले. परंतु ‘वर्दीची स्थिती सुधारली पण कायद्याची परिस्थिती सुधरणेना’अशी काही आवस्था या पोलिस ठाण्याची झाली काय असा प्रश्न निर्माण झाला आहे.

उरुळीकांचन पोलिस ठाण्याच्या हद्दीत बदमाश लोकांनी इतका उच्छाद मांडला की बदमांशाचा हात पोलिसांच्या वर्दीवर पोहचला आहे. वाहने रस्त्यावर आडवून मारहाण, वाहनांची मोडतोड,धमकावणे तसेच वाहनांचा कर्कश आवाजाने खाकीचा धाक संपला असल्याची जाणीव आता लोकांना होऊ लागली आहे. पोलिस यंत्रणा कायदा सुव्यवस्थेचे काम सोडून ‘कमाई’च्या असा प्रश्न निर्माण झाला असून ‘आओ जाओ घर तुम्हारा’ असे म्हणून हे बदमाश कायद्याला नाचवत असल्याने अशा प्रवृत्तीचा निपटारा कधी होणार असा सवाल स्थानिक विचारु लागले आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!