पुण्यातून कोरोनाबाबत मोठी दिलासादायक बातमी आली समोर, उरलेत केवळ ‘एवढे’ रुग्ण


पुणे : पुणे जिल्ह्यातून कोरोना विषाणू लवकरच हद्दपार होणार आहे. सध्या शहरासह पुणे जिल्ह्यात कोरोना संसर्गाचे फक्त ३६ सक्रिय रुग्ण आहेत. त्यातील फक्त सहा रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर इतरांना घरीच विलगीकरणात ठेवून उपचार सुरू आहेत.

यामुळे ही एक मोठी दिलासादायक बातमी आहे. पुणे व पिंपरी चिंचवडमध्ये प्रत्येकी १८ रुग्णांचा समावेश आहे. त्यातील सहा जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या सहापैकी पुणे शहरातील चार तर पिंपरी-चिंचवडमधील दोन रुग्ण आहेत.

दरम्यान, ग्रामीण भाग कोरोनामुक्त झाला असून शहरी भागातूनही लवकरच कोरोना हद्दपार होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे प्रशासनाने याबाबत चांगले निर्णय घेतल्याने हा परिणाम दिसून आला आहे.

मंगळवारी दिवसभरात पुणे जिल्ह्यात फक्त १० नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. दिवसातील एकूण नवीन रुग्णांत पुणे शहरातील सात आणि पिंपरी चिंचवडमधील तीन रुग्णांचा समावेश आहे. काही दिवसांपूर्वी याचठिकाणी बेड उपलब्ध होत नव्हते.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!