शिक्षक मतदारही माघे नाहीत! शिक्षक मतदारसंघातच मतदानाचा भाव ‘दहा हजार’ रुपये! शिक्षक मतदारांचा ५० % पैसे घेण्याचा विदारक रेषो समोर…

जयदिप जाधव

उरुळीकांचन : समाजात जागृक , सुसंस्कारीक व आदर्श पिढी घडविण्याची जबाबदारी असलेल्या शिक्षक पेशावर शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीमुळे शिक्षकांकडेच आदर्श नितीमुल्यांची जपणूक शिल्लक राहलील काय, असा प्रश्न आता शिक्षकांच्या मतदानरुपी अर्थिक उलाढालींच्या कृतीने निर्माण झाला आहे.
शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीत लक्ष्मीदर्शना साठी मतदारांच्या ‘करामती व कुरापती’ चर्चेचा विषय ठरल्याने विद्येच्या पवित्र कार्याचे जबाबदारी असलेल्या पेशात भयानक वास्तव दडल्याचे चित्र मतदानातून उमटले आहे.


समाज घडतो आहे, बिघडतो आहे ,याची सर्वत्र कल्पना आपण घेत असताना विद्येच्या पवित्र कार्यातून आदर्श समाज घडविण्याची जबाबदारी शिक्षक पेशात आहे. मात्र बदलत्या समाज व्यवस्थेत शिक्षकाकडे समाज परावर्तीत करण्याचा एक आशेनचा किरण म्हणून आपण बघत असताना या मतदानाच्या प्रक्रियेतून या पेशाचे भयानक वास्तव समोर आले आहे. समाज अपेक्षित करत असलेल्या निती, मुल्य ,संस्कार यांचीच जपणूक या पेशातील अपप्रवृत्तीच्या विदारक वास्तवाने दिसू लागली आहे.
समाजात अर्थिक स्थित्यांतरे झाल्याने समाज एका समृद्ध जीवनवाटलीकडे अग्रेसर झाला आहे. मात्र अर्थिक वाटचालीकडे वाटचाल होताना, समाजात बिघडत चाललेल्या अर्थिक मुल्यांना सुधारण्याची जबाबदारी शिक्षकांकडे आहे.
मात्र सामाजिक मुल्ये सोडाच पण बिघडलेल्या नितीमुल्यांत शिक्षकपेशाच पाठिमागे राहिला नसल्याची विदारक आवस्था समाजाने निवडणुकीच्या निमित्ताने पाहिली असुन विधानपरिषदेच्या शिक्षक मतदारसंघात शिक्षक मतदाना फुटलेला दहा हजारांचा आकडा कशाची साक्ष देतो हा खरा प्रश्न आहे. या भरीव आकड्यांत आपली बेईमानी लपलेली असली तरी पैसे घेणाऱ्यांची संख्या ५० टक्कांच्याही वर गेल्याने या दडलेल्या परिस्थितीत समाज बिघडण्याचा विदारक वास्तव्यावर शिक्कामोर्तब झाल्याचे चित्र आहे.
विधानपरिषदेची निवडणुक ही आपल्या न्यायहक्कांच्या प्रश्नांसाठी विधिमंडळात आवाज उठावाव म्हणून एक पदसिद्ध रचना असली तरी या ‘मतदारां’त आपण विकले जाऊ असे थोडे भान शिल्लक नसल्याने समाजाने कुठल्या नितिमुल्यांची अपेक्षा आपल्याकडे ठेवावी असा प्रश्न आहे.शिक्षक मतदानात बिनधास्त फर्माईश, अवास्तव अपेक्षा तसेच अर्थिक लोभ मिळवण्यासाठी लढविलेल्या विविध क्लुप्त्या राजकीय पक्षांना ढासळत्या समाज व्यवस्थेचे दर्शन करुन देणारे ठरले आहे.
