चुरस वाढली! पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या मतदानाची आकडेवारी जाहीर; सकाळी १० वाजेपर्यंत किती मतदान?

पुणे : पुणे विभागातील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या मतदानाची आकडेवारी विभागीय आयुक्त कार्यालयाकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे. सकाळी ८ ते १० या दोन तासांच्या कालावधीत झालेल्या मतदानाचा तपशील या अहवालात देण्यात आला आहे. यामध्ये पुरुष, महिला आणि तृतीयपंथी मतदारांची संख्या तसेच मतदानाची टक्केवारी नमूद करण्यात आली आहे.

पुणे पदवीधर मतदारसंघ
पुणे पदवीधर मतदारसंघासाठी एकूण ७४१ मतदान केंद्रे होती. या मतदारसंघातील मतदारांची संख्या पुढीलप्रमाणे आहे.


पुरुष मतदार : २,५६,४४५
महिला मतदार : १,३१,५५३
तृतीयपंथी मतदार : २१
एकूण मतदार : ३,८८,०१९
सकाळी ८ ते १० या वेळेत झालेल्या मतदानाचा तपशील :
पुरुष मतदान : २६,२०४
महिला मतदान : ८,१५८
तृतीयपंथी मतदान : १
एकूण मतदान : ३४,३६३
या कालावधीतील मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे आहे.
पुरुष : १०.२२ टक्के
महिला : ६.२० टक्के
तृतीयपंथी : ४.७६ टक्के
एकूण : ८.८६ टक्के
पुणे शिक्षक मतदारसंघ
पुणे शिक्षक मतदारसंघासाठी एकूण ३१० मतदान केंद्रे होती. या मतदारसंघातील मतदारांची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे.
पुरुष मतदार : ३७,७७६
महिला मतदार : २४,१५६
तृतीयपंथी मतदार : ८
एकूण मतदार : ६१,९४०
सकाळी ८ ते १० या वेळेत झालेल्या मतदानाची आकडेवारी :
पुरुष मतदान : ५,५९०
महिला मतदान : २,४२७
तृतीयपंथी मतदान : ०
एकूण मतदान : ८,०१७
या कालावधीतील मतदानाची टक्केवारी :
पुरुष : १४.८० टक्के
महिला : १०.०४ टक्के
तृतीयपंथी : ० टक्के
एकूण : १२.९४ टक्के
विभागीय आयुक्त कार्यालयाकडून अहवाल प्रसिद्ध
पुणे विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सामान्य प्रशासन शाखेकडून मतदानाच्या टक्केवारीचा हा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. अहवालावर सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांची स्वाक्षरी आहे.
पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात सकाळी १० वाजेपर्यंत झालेल्या मतदानाची ही आकडेवारी असून, पुढील कालावधीत मतदानाची टक्केवारी किती वाढते, याकडे लक्ष लागले आहे.
