मोठ्या मनाचा शेतकरी! घोडी घरी आणण्यासाठी शिरूर येथील शेतकऱ्यांने केला फॉर्च्युनर गाडीचा वापर…

शिरूर : तालुक्यातील ढोकसांगवी येथील शेतकऱ्याने पाच महिन्याची घोडी 25 हजारात विकत घेतली. अहमदनगर येथे बाजारात खरेदी केलेली ही घोडी आणण्यासाठी स्वतंत्र टेम्पो किंवा इतर वाहतुकीची व्यवस्था करावी हे पाचंगे यांना जमले असते.

पण असे न करता त्यांनी आपल्या मुलांप्रमाणे त्यांनी ही घोडी चक्क त्यांच्या फॉर्च्युनर गाडीतून आणली. यामुळे याचे फ़ोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
या शेतकऱ्याचे देखील सर्वत्र कौतुक होत आहे. शेतकरी आपल्या जनावरांना किती महत्त्व देतो, अंत:करणापासून जपतो याचे हे उदाहरण आहे.

अनेकदा प्राण्यांना मारहाण होते, म्हणत प्राणीप्रेमी कोर्टात जातात. यामुळे अशांना हा चांगलाच चरपाक आहे. यामुळे या शेतकऱ्याची सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे.
Views:
[jp_post_view]