LPG सिलेंडर वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! 1 ऑक्टोबरपासून नवा नियम लागू; फक्त 5 दिवस शिल्लक


मुंबई : एलपीजी सिलेंडर वापरणाऱ्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. 1 ऑक्टोबर 2026 पासून घरगुती एलपीजी सिलेंडरच्या सब्सिडीशी संबंधित नियमात बदल होणार आहे. नव्या नियमानुसार, अनुदानाच्या दरात एलपीजी रिफिलचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांना बायोमेट्रिक आधार ऑथेंटिकेशन पूर्ण करणे आवश्यक असणार आहे.

ग्राहकांनी 1 ऑक्टोबरपूर्वी बायोमेट्रिक आधार ऑथेंटिकेशन पूर्ण केले नाही, तरी त्यांचा एलपीजी सिलेंडर पुरवठा थांबणार नाही. मात्र, त्यांना सब्सिडीचा लाभ मिळणार नसून सिलेंडर बाजारभावाने घ्यावा लागू शकतो.

ज्यांचे ऑथेंटिकेशन झालेय, त्यांना पुन्हा गरज नाही

ज्या एलपीजी ग्राहकांचे बायोमेट्रिक आधार ऑथेंटिकेशन यापूर्वीच पूर्ण झाले आहे, त्यांना पुन्हा ही प्रक्रिया करण्याची आवश्यकता नाही. सरकारच्या या प्रक्रियेचा उद्देश अनुदानाचा लाभ पात्र ग्राहकांपर्यंत पोहोचवणे, तसेच अपात्र किंवा बनावट कनेक्शनची ओळख पटवणे हा आहे.

यामुळे सब्सिडीच्या घरगुती सिलेंडरचा व्यावसायिक किंवा औद्योगिक वापर रोखण्यासही मदत होणार आहे. पेट्रोलियम मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, 19 सप्टेंबर 2026 पर्यंत देशातील 27.43 कोटी सक्रिय घरगुती एलपीजी ग्राहकांनी बायोमेट्रिक आधार ऑथेंटिकेशन पूर्ण केले आहे.

बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन कसं करायचं?

एलपीजी ग्राहकांना बायोमेट्रिक आधार ऑथेंटिकेशन पूर्ण करण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. सिलेंडरची डिलिव्हरी घरी आल्यानंतर डिलिव्हरीच्या वेळी ही प्रक्रिया पूर्ण करता येते.

याशिवाय संबंधित गॅस डिस्ट्रीब्यूटरच्या शोरूममध्ये जाऊनही बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन करता येईल. घरबसल्या प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी संबंधित सरकारी तेल कंपन्यांच्या अधिकृत मोबाइल ॲप्सचाही वापर करता येतो.

IndianOil ग्राहकांसाठी IndianOil ONE, BPCL ग्राहकांसाठी HelloBPCL आणि HPCL ग्राहकांसाठी HP PAY ॲपद्वारे ही प्रक्रिया पूर्ण करण्याची सुविधा उपलब्ध आहे.

सब्सिडी मिळवण्यासाठी ग्राहकांनी काय लक्षात ठेवावे?

1 ऑक्टोबरपासून लागू होणाऱ्या नव्या नियमामुळे सब्सिडीच्या दरात एलपीजी रिफिलचा लाभ घेण्यासाठी आधार बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन पूर्ण असणे महत्त्वाचे ठरणार आहे. त्यामुळे ज्या ग्राहकांनी अद्याप ही प्रक्रिया पूर्ण केलेली नाही, त्यांनी निर्धारित मुदतीपूर्वी ती पूर्ण करून घेणे आवश्यक आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!