सोनं खरेदी करण्याचा विचार करताय? आधी जाणून घ्या आजचे ताजे दर

पुणे : सोन्याच्या दरात गेल्या काही दिवसांपासून चढ-उतार सुरू आहेत. आज बाजार उघडण्यापूर्वी मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर 24 कॅरेट सोन्याच्या वायदे दरात 0.01 टक्के म्हणजेच 21 रुपयांची वाढ झाली. त्यामुळे सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 1,52,609 रुपयांवर पोहोचला आहे. आदल्या दिवशी सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 1,52,588 रुपयांवर बंद झाला होता.
बुलियन्सच्या माहितीनुसार, 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 1,51,920 रुपये आहे. तर आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव प्रति औंस 4,337.20 डॉलरवर आहे.

गुडरिटर्न्सच्या माहितीनुसार, 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 1,54,240 रुपयांवर पोहोचला आहे. दिल्लीत सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 1,55,400 रुपयांपर्यंत असल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान, तुमच्या शहरातील सोन्याचा आजचा दर जाणून घेऊया.


IBJA नुसार आजचा सोन्याचा दर
कॅरेट — सकाळचा सोन्याचा दर
24 कॅरेट — 1,53,018 रुपये प्रति 10 ग्रॅम
22 कॅरेट — 1,40,164 रुपये प्रति 10 ग्रॅम
18 कॅरेट — 1,14,764 रुपये प्रति 10 ग्रॅम
14 कॅरेट — 89,516 रुपये प्रति 10 ग्रॅम
तुमच्या शहरातील 24 कॅरेट सोन्याचा आजचा दर
शहर — सोन्याचा दर (प्रति 10 ग्रॅम)
मुंबई — 1,54,090 रुपये
पुणे — 1,54,090 रुपये
नाशिक — 1,54,090 रुपये
नागपूर — 1,54,090 रुपये
कोल्हापूर — 1,54,090 रुपये
सांगली — 1,54,090 रुपये
जळगाव — 1,54,090 रुपये
छत्रपती संभाजीनगर — 1,54,090 रुपये
बाजार विश्लेषक आणि तज्ज्ञ काय म्हणतात?
सराफा व्यापाऱ्यांच्या मते, गेल्या काही दिवसांत मौल्यवान धातूंच्या किमतीत झालेल्या जोरदार वाढीनंतर देशांतर्गत बाजारात विक्रीचा दबाव वाढला आहे. त्यामुळे जागतिक बाजारात तेजीचे वातावरण असतानाही भारतीय सराफा बाजारात सोन्याच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळाली.
पीटीआयच्या वृत्तानुसार, एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक (कमोडिटी) सौमिल गांधी यांनी सांगितले की, परदेशी बाजारात सोन्याच्या दरात काही प्रमाणात सुधारणा झाली असली, तरी या मौल्यवान धातूवर दबाव कायम आहे. सोने सलग तिसऱ्या आठवड्यात घसरणीच्या दिशेने जात असल्याचेही त्यांनी नमूद केले.
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींमुळे महागाई वाढण्याची भीती निर्माण झाली आहे. त्याचबरोबर अमेरिकन ट्रेझरी बाँडवरील वाढते उत्पन्न आणि व्याजदर वाढण्याची शक्यता यामुळे सोन्यासारख्या बिनव्याजी मालमत्तेवर दबाव वाढला आहे.