१६ ऑक्टोबरला मोदी बारामतीत? विद्या प्रतिष्ठानमधील कार्यक्रमाची तयारी सुरू; दौऱ्याकडे सर्वांचं लक्ष


बारामती : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ऑक्टोबर महिन्यात बारामती दौऱ्यावर येण्याची शक्यता आहे. विद्या प्रतिष्ठानच्या नक्षत्र गार्डन येथे प्रेरणास्थळासह भगवान गौतम बुद्ध यांच्या पुतळ्याचे उद्घाटन मोदी यांच्या हस्ते होण्याची शक्यता आहे.

विद्या प्रतिष्ठानचा १६ ऑक्टोबर रोजी स्थापना दिवस असल्याने या कार्यक्रमासाठी ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रण दिल्याचे सांगितले जात आहे.

मोदी यांच्या संभाव्य बारामती दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर स्वागत आणि कार्यक्रमाच्या नियोजनासाठी विद्या प्रतिष्ठानच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स कॉलेजमध्ये बैठक पार पडली. या बैठकीत कार्यक्रमाच्या तयारीसह विविध नियोजनावर चर्चा करण्यात आली.

बैठकीला शरद पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते युगेंद्र पवार, विद्या प्रतिष्ठानचे विश्वस्त किरण गुजर यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार हे एकाच कार्यक्रमासाठी बारामतीत एकत्र येण्याची शक्यता असल्याने या संभाव्य दौऱ्याकडे राजकीय तसेच सामाजिक वर्तुळाचे लक्ष लागले आहे. मात्र मोदींच्या बारामती दौऱ्याबाबत अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!