मोठी बातमी! ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची प्रकृती बिघडली, मुंबईला हलवलं, आयसीयूत उपचार सुरू..

मुंबई : समाजसेवक अण्णा हजारे यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना उपचारासाठी मुंबईतील प्रसिद्ध बॉम्बे हॉस्पिटलच्या आयसीयुत दाखल करण्यात आलं आहे. अण्णा हजारे यांना गेल्या काही दिवसांपासून प्रचंड ताप, अशक्तपणा तसेच शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होण्याचा त्रास जाणवत होता. प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने त्यांना तातडीने मुंबईला हलवण्याचा निर्णय घेण्यात आला.
सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती समोर आली असून, डॉक्टरांचे विशेष पथक त्यांच्या प्रकृतीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. आमदार रोहित पवार यांनीही अण्णा हजारे यांच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची प्रकृती बरी नसल्याचं वृत्त काळजी करण्यासारखं आहे.

अण्णा तब्येतीची काळजी घ्या आणि लवकर बरे व्हा. आमच्या सर्वांच्या सदिच्छा आपल्या पाठीशी आहेत. अण्णांची प्रकृती बिघडली असली तरी सध्या ती स्थिर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. अण्णांचे वय आणि प्रकृतीतील अशक्तपणा लक्षात घेता डॉक्टरांनी खबरदारी म्हणून त्यांना आयसीयूमध्ये ठेवले आहे. प्रसिद्ध फिजिशियन डॉ. गौतम भन्साळी आणि त्यांच्या वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली अण्णांवर उपचार सुरू आहेत.


त्यांच्या विविध वैद्यकीय चाचण्या करण्यात येत असून, अहवालांच्या आधारे पुढील उपचारांची दिशा निश्चित केली जाणार आहे. अण्णांच्या प्रकृतीची बातमी समोर आल्यानंतर त्यांच्या समर्थकांमध्ये आणि अनुयायांमध्ये चिंता निर्माण झाली असून, त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी सर्वत्र प्रार्थना केली जात आहे.
दरम्यान, त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती समोर आली असून, डॉक्टरांचे विशेष पथक त्यांच्या प्रकृतीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. आमदार रोहित पवार यांनीही अण्णा हजारे यांच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त केली आहे. अण्णा हजारे यांनी देशात अनेक आंदोलनात सहभाग घेतला असून अनेक ठिकाणी त्यांनी उपोषण देखील केले आहे.