बच्चू कडूंना मिळाला मंत्रिमंडळाचा दर्जा, एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा…


मुंबई : माजी मंत्री बच्चू कडू यांची नाराजी दूर करण्यासाठी त्यांना मंत्रिपदाचा दर्जा देण्यात आला आहे.
राज्यामध्ये जून महिन्यात दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांग दारी अभियान राबवण्यात येणार आहे.

काही महिन्यांपूर्वी दिव्यांगांसाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करण्यात आले होते. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक पत्रक काढून राज्यात जून महिन्यात दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगाच्या दारी हे आभियान राबवले जाणार असल्याचे जाहीर केले.

यासाठी एक समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीच्या अध्यक्षपदी बच्चू कडू यांची निवड करण्यात आली आहे. तसेच त्यांना मंत्रीपदाचा दर्जा देण्यात आला आहे.

यामुळे आता त्यांची नाराजी दूर करण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी हा निर्णय घेतला होता. गेल्या काही दिवसांपासून मंत्रिपद मिळाले नसल्याने ते नाराजी व्यक्त करत होते.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!