कर्जमाफीला शेतकऱ्यांचा उदंड प्रतिसाद; राज्यात आधार प्रमाणीकरणाला वेग; ८.३३ लाखांहून अधिक शेतकऱ्यांचे ई-केवायसी पूर्ण..


पुणे : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना (२०२६) अंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण (e-KYC) अभियान राज्यभर वेगाने सुरू असून, ३१ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ४ वाजेपर्यंत राज्यातील एकूण १६,९६,२०१ लाभार्थींपैकी ८,३३,२२३ शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण झाले आहे. ही प्रगती ४९.८४ टक्के इतकी आहे.

विभागनिहाय आढाव्यानुसार अमरावती विभागात ५४.१५ टक्के, नाशिक विभागात ५४.९३ टक्के, पुणे विभागात ६०.२६ टक्के, कोल्हापूर विभागात ६४.२६ टक्के, नागपूर विभागात ४८.४८ टक्के, कोकण विभागात ४९.१५ टक्के, लातूर विभागात ३९.७७ टक्के, तर छत्रपती संभाजीनगर विभागात ३५.०६ टक्के आधार प्रमाणीकरण पूर्ण झाले आहे.

जिल्हानिहाय प्रगतीमध्ये अहमदनगर (७३.४७ टक्के), भंडारा (६९.८९ टक्के), वाशीम (६७.४८ टक्के), ठाणे (६७.४२ टक्के), सांगली (६७.३४ टक्के), सातारा (६६.५८ टक्के), पुणे (६५.४४ टक्के) आणि नाशिक (६४.८६ टक्के) या जिल्ह्यांनी उल्लेखनीय प्रगती नोंदविली आहे.

योजनेचा लाभ वेळेत मिळण्यासाठी पात्र शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण (e-KYC) तातडीने पूर्ण करावे, तसेच संबंधित यंत्रणांनी प्रलंबित लाभार्थ्यांशी संपर्क साधून हे काम गतीने पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!