खासदार पार्थ पवार आणि कायनात धार विवाहबंधनात अडकणार, लग्नाची तारीख जाहीर, जाणून घ्या..


मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे विद्यमान खासदार पार्थ पवार हे लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. त्यांची होणारी पत्नी कायनात धार यांच्यासोबत त्यांच्या लग्नाची तारीख आणि स्थळ निश्चित करण्यात आले आहे. मागील काही महिन्यांपासून त्यांच्या नात्याबाबत आणि लग्नाच्या मुहूर्ताबाबत चर्चा सुरु होती.

आता या सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. काहीच दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची नात आणि खासदार सुप्रिया सुळे यांची कन्या रेवती सुळे हिचा विवाहसोहळा मुंबई अत्यंत थाटामाटात पार पडला होता. या बहुचर्चित विवाहसोहळ्याला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह खासदार पार्थ पवार यांनी हजेरी लावली होती.

या सोहळ्यात पार्थ पवार यांच्या सोबत कायनात धार यांची लक्षवेधी उपस्थिती होती. तेव्हापासूनच या दोघांच्या लग्नाची कुजबूज राजकीय आणि सामाजिक वर्तुळात वेगाने सुरू झाली होती. अखेर या सर्व चर्चा खऱ्या ठरल्या असून लवकरच पवार कुटुंबाच्या अंगणात पुन्हा एकदा सनई-चौघडे वाजणार आहेत. ​पार्थ पवार यांच्या भावी पत्नी कायनात धार या मूळच्या चंदीगड येथील रहिवासी आहेत.

मध्यंतरीच्या काळात त्यांच्या नावाबाबत तसेच जन्मस्थळाबाबत अतिशय चुकीची आणि दिशाभूल करणारी माहिती प्रसारित केली होती. या सर्व चुकीच्या बातम्यांचे तातडीने खंडन करत अचूक आणि अधिकृत माहिती लोकांसमोर यावी, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उमेश पाटील यांनी पुढाकार घेत सविस्तर माहिती सर्व माध्यमांना दिली आहे.

राज्याचे दिवंगत नेते अजित पवार यांच्या निधनानंतर समाजात काही धार्मिक शंका उपस्थित केल्या जात होत्या. कुटुंबात अचानक निधन झाल्यास एका वर्षाच्या आत लग्न कार्य करावे लागते, अन्यथा पुढील तीन वर्षे कोणतेही विवाह कार्य करता येत नाही, असा एक प्रघात हिंदू समाजात मानला जातो. हा वाढता संभ्रम दूर करण्यासाठी उमेश पाटील यांनी थेट करवीर पीठाच्या शंकराचार्यांची भेट घेतली.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!