लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज! सरकार आणणार नवी योजना; महिलांना मिळणार रोजगाराची मोठी संधी


मुंबई : राज्य सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या बँक खात्यात दरमहा १,५०० रुपये जमा केले जात आहेत. याशिवाय महिलांसाठी विविध कल्याणकारी योजनाही राज्य सरकारकडून राबवल्या जात आहेत.

दरम्यान, रेशन दुकानांमार्फत मोफत साड्यांचे वाटप बंद झाल्यानंतर मंत्री गिरीश महाजन यांनी महिलांसाठी नव्या योजनेची घोषणा केली आहे. माध्यमांशी बोलताना गिरीश महाजन म्हणाले की, रेशन दुकानांमधून साड्यांचे वाटप करताना अनेक अडचणी आणि तक्रारी समोर आल्या.

त्यामुळे ही योजना बंद करण्यात आली. यामागे सरकारकडे निधी नसल्याचा कोणताही संबंध नाही. ते पुढे म्हणाले की, साड्यांच्या ऐवजी महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणारी नवी योजना सरकार आणत आहे. या योजनेमुळे महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यास मदत होईल.

यासाठी सरकारला अधिक खर्च करावा लागला तरी हरकत नाही, मात्र महिलांच्या हिताची आणि रोजगारनिर्मितीला चालना देणारी योजना राबवली जाईल. या नव्या योजनेबाबतची सविस्तर माहिती आणि अंमलबजावणीचा आराखडा लवकरच जाहीर केला जाणार असल्याचेही महाजन यांनी संकेत दिले.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!