पत्नीचं दुसऱ्यासोबत अफेअर असल्याचा संशय? संतापलेल्या पतीनं घरातला मिक्सर घेतला अन्…,नंतर स्वतःच पोलिसांत हजर


पुणे : पुणे जिल्ह्यातील चाकण (ता. खेड) येथे चारित्र्याच्या संशयातून २७ वर्षीय पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पत्नीचा मिक्सरच्या वायरने गळा आवळून खून केल्यानंतर आरोपी पती स्वतःच चाकण उत्तर पोलीस ठाण्यात हजर झाला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

मृत महिलेचे नाव बडीमा रफिक पठाण (वय २७) असून, आरोपी पती रफिक पठाण (वय ३२, व्यवसाय- गवंडी) याला पोलिसांनी अटक केली आहे. तर, रफिक पठाण (वय ३२, व्यवसाय गवंडी) असं आरोपी पतीचं नाव आहे. या प्रकरणी महिलेचे वडील मकबूल नदाफ (वय ५५) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी पतीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी रफिक पठाण याला पत्नीच्या चारित्र्यावर संशय होता. याच कारणावरून दोघांमध्ये वारंवार वाद होत होते. अखेर या संशयाचं रूपांतर या भयंकर घटनेत झालं. धक्कादायक बाब म्हणजे, हत्या केल्यानंतर आरोपी घाबरून फरार न होता थेट चाकण उत्तर पोलीस ठाण्यात गेला आणि आपण पत्नीचा खून केल्याची माहिती पोलिसांना दिली. जणू त्याला आपल्या या कृत्याचा काहीही पश्चाताप नव्हता.

त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. मात्र, केवळ संशयातून घडलेल्या या भयंकर हत्या प्रकरणामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!