‘तुझे वडील बोलावत आहेत’ म्हणत घरात नेलं; ‘नराधम अत्याचार करत होता, ‘ती’ निर्वस्त्र घरातून पळाली अन्…पुण्यात शाळकरी मुलीसोबत भयावह प्रकार


पुणे : पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात एका अल्पवयीन शाळकरी मुलीवर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रसंगावधान राखत मुलीने आरोपीच्या तावडीतून स्वतःची सुटका केली. या प्रकरणी भोर पोलिसांनी अवघ्या ३६ तासांत फरार आरोपीला सातारा येथून अटक केली आहे. मात्र या घटनेनं संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहिती नुसार, पीडित अल्पवयीन मुलगी नेहमीप्रमाणे शाळा सुटल्यानंतर घरी जात होती. ती रस्त्याने जात असतानाच आरोपीने तिला गाठले. तुझे वडील घरात बसले आहेत, त्यांनी तुला आत बोलावलं आहे, अशी खोटी बतावणी करत या नराधमाने मुलीला एका घरात नेलं. मुलगी घरात जाताच आरोपीने तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न सुरू केला.

अचानक ओढवलेल्या या भयानक प्रसंगाने मुलगी घाबरली, मात्र तिने अत्यंत शिताफीने स्वतःचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला. तिने आरोपीकडे पाणी पिण्याचा बहाना केला. पाणी पिण्यासाठी ती किचनमध्ये आली. आरोपीचं लक्ष विचलित होताच, तिने प्रसंगावधान दाखवलं आणि नराधमाच्या तावडीतून स्वतःची सुटका करून घेतली. तिने घराच्या मागच्या दारातून थेट बाहेर पळ काढला. ती निर्वस्त्रावस्थेत घराबाहेर पडली आणि रस्त्यावर धावली.

यावेळी आसपासच्या लोकांनी तिला तातडीने कपडे दिले. या घटनेनंतर परिसरात प्रचंड संताप व्यक्त केला जात होता. पीडित कुटुंबाने दिलेल्या तक्रारीवरून भोर पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत (पॉस्को – POCSO) गुन्हा दाखल करण्यात आला.

गुन्हा दाखल होताच आरोपी फरार झाला होता. भोर पोलिसांनी तपासाची चक्रे जलदगतीने फिरवत तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपीचा माग काढला. अखेर गुन्हा दाखल झाल्यापासून अवघ्या ३६ तासांच्या आत पोलिसांनी फरार आरोपीला सातारा येथून शिताफीने अटक केली, याबाबतची माहिती भोर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निलेश माने यांनी दिली.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!