LPG ग्राहकांसाठी मोठी बातमी! एलपीजी गॅस सिलेंडरचे नवीन दर जाहीर; जाणून घ्या आजचे भाव

मुंबई : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती पुन्हा वाढू लागल्याने एलपीजी (LPG) सिलेंडरच्या दरांबाबत ग्राहकांची चिंता वाढली आहे. ब्रेंट क्रूडचा भाव 85 डॉलर प्रति बॅरलच्या पुढे गेल्याने आगामी काळात घरगुती आणि व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या दरांवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, देशातील प्रमुख शहरांतील आजचे एलपीजी दरही जाहीर झाले आहेत.
प्रमुख शहरांतील आजचे LPG दर

दिल्ली : घरगुती (14.2 किलो) – ₹942 | व्यावसायिक (19 किलो) – ₹2,930
मुंबई : घरगुती – ₹941.50 | व्यावसायिक – ₹2,885.50
नोएडा : घरगुती – ₹939.50 | व्यावसायिक – ₹2,930
कोलकाता : घरगुती – ₹968 | व्यावसायिक – ₹3,081.50
चेन्नई : घरगुती – ₹957.50 | व्यावसायिक – ₹3,106
बंगळुरू : घरगुती – ₹944.50 | व्यावसायिक – ₹3,021
पाटणा आणि हैदराबादमध्ये सर्वाधिक दर
प्रमुख शहरांमध्ये पाटणा येथे घरगुती एलपीजी सिलेंडरचा दर ₹1,031.50 असून व्यावसायिक सिलेंडर ₹3,227 इतका आहे. हैदराबादमध्ये घरगुती सिलेंडर ₹994, तर व्यावसायिक सिलेंडर ₹3,191 दराने उपलब्ध आहे. लखनौमध्ये घरगुती सिलेंडर ₹979.50, तर व्यावसायिक सिलेंडर ₹3,052.50 आहे. गुरुग्राममध्ये घरगुती सिलेंडर ₹950.50, तर व्यावसायिक सिलेंडर ₹2,947.50 दराने मिळत आहे.

कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींचा परिणाम होणार?
अमेरिका-इराण तणावाच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय बाजारात ब्रेंट क्रूडचा भाव 85.08 डॉलर प्रति बॅरलपर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे तेल कंपन्यांवरील आर्थिक दबाव वाढण्याची शक्यता असून, आगामी दरआढाव्यात एलपीजी सिलेंडरच्या किमतीत बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे पुढील दरवाढीच्या निर्णयाकडे ग्राहकांचे लक्ष लागले आहे.
