संत तुकाराम महाराज पालखी सोहळा विसाव्यासाठी उरुळी कांचन गावात नेण्यास पालखी प्रमुखांचा नकार ; ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी..!


उरुळी कांचन : संत तुकाराम महाराज पालखी सोहळा विसाव्यासाठी उरुळी कांचन येथील काळभैरवनाथ मंदिरात नेण्यास नकार दिला आहे . हा नकार पालखी सोहळा प्रमुखांनी दिला असल्याने पालखी सोहळ्याच्या या भूमिकेची उरुळी कांचन ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.

संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या सोहळा प्रमुखांनी १० ते २८ जून यादरम्यान चा पालखी सोहळ्याच्या प्रवासाचा तपशीलवार कार्यक्रम जाहीर केला आहे. या पालखी सोहळ्यात पारंपारीकरीत्या उरुळी कांचन चा दुपारचा विसावा घेऊन पालखी रात्रीच्या मुक्कामास यवत मुक्कामी मार्गस्थ होण्याची परंपरा आहे. या परंपरेनुसार उरुळीकांचन गावचा ग्रामदैवत काळभैरवनाथ मंदिरात विसावा न होता. तो पुणे सोलापूर रोड वरच वेगळ्या पद्धतीने व्यवस्था केलेल्या ठिकाणी होईल असे जाहीर केल्याने उरुळी कांचन व पंचक्रोशीतील संत तुकाराम महाराज प्रेमी व विठ्ठल प्रेमी वैष्णवांच्या मध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.

वारकरी सांप्रदायाच्या वैष्णवांचा मेळा हा गेल्या ३३८ वर्षांपासून देहू ते पंढरपूर असा चालवला जातो, तो मार्गस्थ होत असताना वेगवेगळ्या गावातून, वाड्या वस्त्यांतून रस्त्याने जात असतो. या मार्गातील वैष्णवाला तुकाराम महाराजांबरोबर विठ्ठलाच्या दर्शनाचा लाभ घेता येतो, अशा या पारंपारिक धार्मिक सोहळ्याचे पूर्वदोषांमुळे नियोजन बदलणे योग्य नसून  अशा नियोजित व्यवस्थेने वारकरी सांप्रदाय दुखावला जात असून ३३८ वर्षांची परंपरा मोडीत काढणे सोहळ्याच्या उत्सवाला धरुन नसल्याचे मत या ठिकाणी दिंडीप्रमुखांंनी व्यक्त केले आहे.

दरम्यान संत तुकाराम महाराज पालखी सोहळा प्रमुखांनी घेतलेल्या या निर्णयाचे उरुळी कांचन ग्रामपंचायतच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देऊन नेहमीच्या प्रथा परंपरेनुसार संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचा विसावा उरुळी कांचन येथील काळभैरवनाथ मंदिरातच घ्यावा अशी मागणी केलेली आहे.

स्थानिक वारकरी भावनेचा विचार करावा – वारकरी सांप्रदाय

संत तुकाराम महाराज पालखी सोहळा उरुळी कांचन येथे दुपारचा विसाव्याची परंपरा आहे. ग्रामदैवत श्री भैरवनाथाच्या मंदिरात धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्याची परंपरा आहे. परंतु पालखी सोहळा पुणे-सोलापूर महामार्गावर विसवणार असल्याने धार्मिक कार्यक्रम, दर्शन या कार्यक्रमांना मर्यादा येणार आहे. स्थानिक वारकऱ्यांच्या भावनेचा प्रश्न असल्याने पालखी सोहळा प्रमुखांनी पुर्नविचार करावा अशी मागणी होऊ लागली आहे.तर स्थानिक सांप्रदायिक मंडळींनी ग्रामपंचायत प्रशासन व स्थानिक राजकीय पदाधिकाऱ्यांनी हा सोहळा पारंपारीक गावातून विसावा घेऊन मार्गस्थ होण्यासाठी कर्तृत्व दाखवावे, अशीही तीव्र मागणी होऊ लागली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!