हर्षवर्धन पाटलांच करायचं काय, खाली मुंड वर पाय…! ऊस बिलासाठी काढलेला मोर्चा पोलिसांनी अडवल्यावर शेतकऱ्यांच्या घोषणा

इंदापूर : भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्या ताब्यातील साखर कारखान्याच्या विरोधात पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे संचालक तथा इंदापूर बाजार समितीचे माजी सभापती आप्पासाहेब जगदाळे यांनी आंदोलन पुकारले आहे.
आता ऊस बिलाच्या मागणीसाठी काढण्यात आलेल्या मागणीसाठी मोर्चाला पोलीस प्रशासनाने कारखान्याकडे जाणाऱ्या चौकात अडवले आहे. यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
यावेळी शेतकऱ्यांनी मोठ्या घोषणा दिल्या. यावेळी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. दरम्यान, इंदापूर तालुक्यातील नीरा भीमा आणि कर्मयोगी साखर कारखान्याने गाळप झालेल्या उसाचे बिल वेळेत न दिल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.
शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने निरा भिमा कारखाना येथे आत्मक्लेश आंदोलन करण्यात येणार आहे, असे जगदाळे यांनी सांगितले. यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.