मोठी बातमी! भारतात टेलिग्रामवर बंदी; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, जाणून घ्या कारण


नवी दिल्ली : नीट पेपरफुटी प्रकरणामुळे देशभरात निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर टेलिग्राम अॅपवर निर्बंध घालण्यात आल्याची चर्चा रंगली आहे. नीट परीक्षेचा प्रश्नपत्रिका टेलिग्रामच्या माध्यमातून लीक झाल्याचा आरोप झाल्यानंतर प्रशासनाने परीक्षेच्या सुरक्षेबाबत विशेष खबरदारी घेतल्याचे सांगितले जात आहे.

नीट परीक्षेपूर्वी प्रश्नपत्रिका फुटल्याचा प्रकार समोर आल्यानंतर देशभरात मोठी खळबळ उडाली होती. त्यानंतर परीक्षा प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. आता 21 जून रोजी होणाऱ्या पुनर्परीक्षेसाठी प्रशासनाकडून कडेकोट सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. प्रश्नपत्रिका सुरक्षितपणे परीक्षा केंद्रांपर्यंत पोहोचाव्यात यासाठी विशेष यंत्रणा कार्यरत असून विविध स्तरांवर देखरेख वाढवण्यात आली आहे.

दरम्यान, नीट पेपरफुटी प्रकरणाचे धागेदोरे महाराष्ट्रापर्यंत पोहोचल्याचे तपासात समोर आले आहे. पुणे, लातूर आणि नाशिक येथून काही विद्यार्थी आणि संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे. पुण्यातील एका शाळेच्या मुख्याध्यापिकेसह काही जणांवर कारवाई करण्यात आली असून तपास यंत्रणा या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहे.

तपासादरम्यान मनिषा वाघमारे, शुभम खैरनार, धनंजय लोखंडे, शिवराज मोटेगावकर आणि पी. व्ही. कुलकर्णी यांच्यासह अनेक आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. आतापर्यंत या प्रकरणात 13 जणांवर कारवाई करण्यात आली असून त्यापैकी बहुतांश आरोपी महाराष्ट्रातील असल्याची माहिती समोर आली आहे.

आरोपींवर आर्थिक व्यवहारांच्या मोबदल्यात परीक्षार्थींना प्रश्नपत्रिका पुरवल्याचा तसेच संबंधित नोंदी ठेवल्याचा आरोप आहे. पुनर्परीक्षा पारदर्शक आणि गैरप्रकारमुक्त वातावरणात पार पडावी यासाठी प्रशासनाने विशेष सुरक्षा उपाययोजना केल्या असून प्रत्येक टप्प्यावर कडक देखरेख ठेवली जात आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!