शेअर मार्केटच्या नादात सर्व काही गमावलं; आधी अख्ख्या कुटुंबाची हत्या अन् नंतर मुख्याध्यापकाने उचललं टोकाचं पाऊल, सोलापूर हादरलं


सोलापूर : बार्शी तालुक्यातील हत्तीज गावात घडलेल्या एका धक्कादायक घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला आहे. जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक असलेल्या व्यक्तीने पत्नी आणि दोन मुलांना विष देऊन ठार केल्यानंतर स्वतः गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.

मृतांमध्ये योगेश पाटील, त्यांची पत्नी माधुरी पाटील तसेच अथर्व आणि शिवांश या दोन मुलांचा समावेश आहे. या दुर्दैवी घटनेमुळे बार्शी तालुक्यावर शोककळा पसरली आहे.

प्राथमिक तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, योगेश पाटील हे नंदुरबार जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेत मुख्याध्यापक म्हणून कार्यरत होते. गेल्या काही वर्षांपासून त्यांनी शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली होती. मात्र, शेअर मार्केटमधील मोठ्या नुकसानामुळे त्यांच्यावर आर्थिक संकट ओढावले होते.

हे नुकसान भरून काढण्यासाठी त्यांनी विविध ठिकाणांहून तब्बल 1 कोटी 80 लाख रुपयांचे कर्ज घेतल्याची माहिती समोर आली आहे. वाढते कर्ज, आर्थिक ताण आणि वसुलीचा दबाव यामुळे ते मानसिक तणावाखाली असल्याचे सांगितले जात आहे.

या तणावातूनच त्यांनी हत्तीज येथील राहत्या घरी हे टोकाचे पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, त्यांनी प्रथम पत्नी आणि दोन्ही मुलांना विष दिले. त्यानंतर स्वतः गळफास घेऊन जीवन संपवले.

घटनेची माहिती मिळताच बार्शी तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तपासादरम्यान पोलिसांना योगेश पाटील यांनी लिहिलेली तब्बल 22 पानांची चिठ्ठी सापडली आहे. या चिठ्ठीतील मजकूर आणि इतर पुराव्यांच्या आधारे पोलीस पुढील तपास करत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!