छोटेसे टुमदार घर असे सजवा…!


पुणे : आज आपल्या बजेटमध्ये जी जागा आहे त्यातच आपल्याला समाधान मानायला लागतं. त्यांत तुम्हाला सजावटीची आवड असेल तर लहान घरात या गोष्टी कशा करायच्या हा प्रश्न तुम्हाला नक्की पडत असेल हो ना ? आज पूर्वीप्रमाणे सर्वांकडे मोठ्या जागा किंवा वाडे नसतात. आहे त्या जागेतच सर्वांना आपल्या मनासारखं घर सजवायला लागतं. मात्र, असं जरी असलं तरी आहे त्या जागेत आपल्याला सुंदर घर सजवता येऊ शकते, हे आज आपण बघुयात.

अनेकदा घराचा हॉल खूप मोठा असतो, त्या तुलनेत मात्र इतर रूम्स लहान असतात तेव्हा फक्त पडदे लावून तुम्ही पार्टीशन करू शकता असं नाही तर शोभिवंत झाडांच्या कुंड्या किंवा बाजारात मिळणारी शोभेची झाडं ठेवून तुम्ही उरलेली जागा वापरू शकता. त्यामुळे त्या हॉलमध्येच दोन रूम्स आहेत असा फील येईल.

ज्यांचा स्वतःचा बंगला आहे किंवा स्वतःचं खूप मोठं घर आहे त्यांना स्वतंत्र लायब्ररीची चैन परवडू शकते. मात्र, सर्वसामान्यांना हे जमू शकत नाही तेव्हा बुक शेल्फमध्ये पुस्तके ठेवण्यापेक्षा निरनिराळे आकार भिंतीना करून तुम्ही बेडरूम्समध्ये सुद्धा पुस्तके ठेवू शकता. यामुळे तुमच्या रूमला एक डिझानर लूक मिळेल.

घरात जर काही पितळेच्या किंवा जुन्या वस्तू असतील तर एका कोपऱ्यात त्या नीट सजवून ठेवा. आणि त्यावर ‘एखादी व्हास किंवा आजूबाजूला फोटो फ्रेम ठेवू शकता. यामुळे तुमच्या घराला एका हटके लूक येईल.

त्यामुळे नक्कीच तुमचे नातेवाईक आणि मित्र – मैत्रीणी तुमच्यावर खूश होतील. ड्रेसिंग मोठा आरसा टेबलवर एक खूप मोठा लावण्यापेक्षा तुम्ही सात किंवा आठ अरसे लावून डिझाईन तयार करू शकता. यामुळे तुमचा ड्रेसिंग टेबल उठून दिसेल. तुमच्या घरात अनावश्यक समान असेल तर ते काढून टाका. मात्र आहे त्या वस्तू तुम्ही क्रिएटीव्हली मांडून ठेवू शकता.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!