विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या; पतीनेच घातपात केल्याचा नातेवाईकांचा संशय


लोणी काळभोर, ता. ६ : कौटुंबिक वादातून एका विवाहितेने घरातील खिडकीला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना लोणी काळभोर (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील माळीमळा परिसरात घडली आहे. सदर घटना शुक्रवार (६ जून) रोजी सकाळी उघडकीस आली आहे.

प्रियांका लक्ष्मण वाघमारे (वय २४) असे मृत विवाहितेचे नाव असून, तिच्या मृत्यूबाबत नातेवाईकांनी संशय व्यक्त केला असून पती लक्ष्मण वाघमारे हा दारूच्या नशेत प्रियांकाला वारंवार मारहाण करत असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. या प्रकरणात घातपाताची शक्यता नाकारता येत नसल्याचे त्यांनी सांगितले.

घटनेची माहिती मिळताच लोणी काळभोर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. त्यानंतर प्रियांका वाघमारे यांचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पुण्यातील रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार असून, त्यानुसार पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली. या घटनेमुळे लोणी काळभोर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!