आमिर खान तिसऱ्यांदा करणार लग्न, वयाच्या 61व्या वर्षी चढणार बोहल्यावर, स्वतःच लग्नाची तारीख केली जाहीर


मुंबई : बॉलिवूडचा ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ अमीर खान पुन्हा एकदा त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. वयाच्या 61 व्या वर्षी आमिर तिसऱ्यांदा विवाहबंधनात अडकणार असल्याची माहिती समोर आली आहे. तो त्याची गर्लफ्रेंड गौरी स्प्रॅटसोबत येत्या 5 जुलै रोजी खासगी समारंभात लग्न करणार असल्याचे वृत्त आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हा विवाहसोहळा अत्यंत साध्या आणि कौटुंबिक वातावरणात पार पडणार असून त्यात केवळ कुटुंबीय आणि जवळचे मित्रमंडळी उपस्थित राहणार आहेत. सध्या आमिर आणि गौरी स्प्रॅट लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत असून लवकरच ते आपल्या नात्याला अधिकृत स्वरूप देणार आहेत.

अमेरिका दौऱ्यावर असलेल्या आमिर खानने ‘व्हरायटी इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत आपल्या खासगी आयुष्याबाबत महत्त्वाचा खुलासा केला. त्याने 5 जुलै 2026 रोजी विवाह करणार असल्याचे संकेत दिले आहेत. 2025 मध्ये आमिरने आपल्या नात्याची सार्वजनिक कबुली दिली होती. त्यानंतर मार्च महिन्यातील वाढदिवसानिमित्त त्याने गौरीची सर्वांना ओळख करून दिली होती.

गौरी स्प्रॅट ही आमिरपेक्षा 14 वर्षांनी लहान असून तिचे वय 47 वर्षे आहे. ती एका सहा वर्षांच्या मुलाची आई आहे. त्यामुळे हा विवाह आमिरचा तिसरा संसार ठरणार आहे. याआधी त्याने 1986 मध्ये रीना दत्ता यांच्याशी, तर 2005 मध्ये किरण राव यांच्याशी विवाह केला होता. 2021 मध्ये किरण राव यांच्यापासून विभक्त झाल्यानंतर तब्बल पाच वर्षांनी तो नव्या आयुष्याची सुरुवात करणार आहे.

मूळची बेंगळुरू येथील असलेली गौरी स्प्रॅट अँग्लो-इंडियन कुटुंबातून येते. तिच्या वडिलांकडून तमिळ आणि ब्रिटिश, तर आईकडून पंजाबी आणि आयरिश वारसा तिला लाभला आहे. विविध संस्कृतींचा वारसा लाभला असला तरी ती स्वतःला अभिमानाने भारतीय मानते. विशेष म्हणजे तिच्या ब्रिटिश वंशाच्या आजोबांनी भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात योगदान दिले होते. याचा उल्लेख इतिहासकार रामचंद्र गुहा यांच्या लेखनातही आढळतो.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!