तुमच्या शहरात पेट्रोल-डिझेल स्वस्त की महाग? 5 जूनचे ताजे दर; मुंबई ते दिल्ली जाणून घ्या भाव…

नवी दिल्ली : देशभरात वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडत असताना पेट्रोल-डिझेलच्या किमतीही चर्चेचा विषय ठरत आहेत. पेट्रोल, डिझेल, दूध, डाळीपासून ते इतर जीवनावश्यक वस्तूंपर्यंत अनेक गोष्टींचे दर वाढलेले पाहायला मिळत आहेत. मात्र आज, 5 जून 2026 रोजी पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये कोणताही बदल झालेला नाही.
आजचे पेट्रोल-डिझेल दर (रुपये प्रति लिटर)

दिल्ली – पेट्रोल ₹102.12 | डिझेल ₹95.20
कोलकाता – पेट्रोल ₹113.51 | डिझेल ₹99.82
मुंबई – पेट्रोल ₹111.21 | डिझेल ₹97.83
चेन्नई – पेट्रोल ₹107.77 | डिझेल ₹99.55
नोएडा – पेट्रोल ₹102.12 | डिझेल ₹97.56
चंदीगड – पेट्रोल ₹101.51 | डिझेल ₹89.47
लखनऊ – पेट्रोल ₹101.89 | डिझेल ₹95.36
पाटणा – पेट्रोल ₹113.37 | डिझेल ₹99.36
रांची – पेट्रोल ₹105.26 | डिझेल ₹100.40
भोपाळ – पेट्रोल ₹114.57 | डिझेल ₹99.6
11 दिवसांत चार वेळा दरवाढ
मे महिन्याच्या मध्यापासून इंधनाच्या किमतींमध्ये सातत्याने वाढ झाली आहे. 15 मेपासून सुरू झालेल्या वाढीनंतर काही दिवसांतच पेट्रोल-डिझेलच्या दरात एकूण 7 ते 8 रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. यामुळे वाहनचालकांच्या खिशाला मोठी झळ बसली आहे.
पेट्रोल-डिझेल महागण्यामागचं कारण काय?
मध्य पूर्वेतील तणावपूर्ण परिस्थिती, कच्च्या तेलाच्या वाढलेल्या किमती आणि जागतिक पुरवठा साखळीवरील दबाव यामुळे इंधनाचे दर वाढल्याचे सांगितले जात आहे. भारत आपल्या गरजेपैकी मोठ्या प्रमाणात कच्चे तेल आयात करतो. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींचा थेट परिणाम देशांतर्गत इंधन दरांवर होतो.

घरबसल्या कसे जाणून घ्याल इंधनाचे दर?
SMS द्वारे तुम्ही दररोजचे पेट्रोल-डिझेलचे भाव सहज तपासू शकता.

Indian Oil ग्राहकांनी RSP <City Code> लिहून 9224992249 वर SMS पाठवावा.
BPCL ग्राहकांनी RSP <City Code> लिहून 9223112222 वर SMS पाठवावा.
HPCL ग्राहकांनी HPPRICE <City Code> लिहून 9222201122 वर SMS पाठवावा.
याशिवाय संबंधित तेल कंपन्यांच्या अधिकृत वेबसाइट किंवा मोबाइल अॅपवरूनही ताजे दर पाहता येतात.