नाशिक विधान परिषद निवडणुकीत महायुतीत बंडखोरीचा भडका; शिंदे गटाला मोठा धक्का, जागेवर संकट


नाशिक : नाशिक विधान परिषद निवडणुकीत महायुतीसमोरच मोठे आव्हान उभे राहिले आहे. भाजपचे नेते गणेश गीते यांनी बंडखोरीची भूमिका कायम ठेवल्याने शिवसेना शिंदे गटाचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

महायुतीच्या जागावाटपापूर्वीच गणेश गीते यांनी भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र नंतर ही जागा शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला गेल्याने नरेंद्र दराडे यांना अधिकृत उमेदवारी देण्यात आली. दरम्यान, गणेश गीते यांचे बंधू गोकूळ गीते यांनीही अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

यावर प्रतिक्रिया देताना गणेश गीते यांनी निवडणूक लढवण्याच्या निर्णयावर ठाम असल्याचे स्पष्ट केले. “मी गेल्या वर्षभरापासून या निवडणुकीची तयारी करत आहे. पक्षानेही मला उमेदवारीबाबत शब्द दिला होता. महायुतीमुळे जागावाटप बदलले असले तरी मी अद्याप निवडणूक लढवण्यावर ठाम आहे,” असे त्यांनी सांगितले.

गीते यांनी दावा केला की, त्यांना मोठ्या प्रमाणात स्थानिक प्रतिनिधींचा पाठिंबा मिळत असून अनेक नगरसेवक त्यांच्याशी संपर्क साधत आहेत. तसेच या निवडणुकीत व्हीप लागू होत नसल्याने कारवाईचा प्रश्नच निर्माण होत नसल्याचेही त्यांनी म्हटले.

दरम्यान, गोकूळ गीते यांची उमेदवारी ही संभाव्य राजकीय दबावाच्या पार्श्वभूमीवर दाखल करण्यात आल्याचेही गणेश गीते यांनी स्पष्ट केले. आमच्यापैकी एक जण अर्ज मागे घेईल, असे संकेत त्यांनी दिले.

शिवसेना उमेदवार नरेंद्र दराडे यांच्यावरही गीते यांनी टीका केली. “दराडे यांनी मतदारसंघात पुरेसा संपर्क ठेवलेला नाही. त्यांना ऐनवेळी उमेदवारी मिळाल्याने स्थानिक मतदारांमध्ये नाराजी आहे आणि त्याचा फायदा मला होईल,” असा दावा त्यांनी केला.

उमेदवारी अर्ज माघारीची मुदत जवळ येत असताना नाशिक विधान परिषद निवडणुकीत महायुतीतील अंतर्गत संघर्ष अधिकच चर्चेत आला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!