‘हिल पोरी हिला’मध्ये पहिल्यांदाच गौतमी पाटील-भाऊ कदमांची जोडी; चाहत्यांची उत्सुकता शिगेला


मुंबई : आपल्या अदाकारी आणि लावणीने प्रेक्षकांना भुरळ घालणारी गौतमी पाटील पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यावेळी ती तिच्या आगामी गाण्यामुळे चर्चेत असून, विशेष म्हणजे या गाण्यात ती लोकप्रिय अभिनेता आणि विनोदवीर भाऊ कदम यांच्यासोबत पहिल्यांदाच झळकणार आहे.

गौतमी पाटीलने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर आगामी ‘हिल पोरी हिला’ या गाण्याचा फर्स्ट लूक शेअर केला आहे. हे गाणे 5 जून रोजी प्रदर्शित होणार असून त्याची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.

समोर आलेल्या पोस्टरमध्ये भाऊ कदम यांनी दिवंगत अभिनेते दादा कोंडके यांच्या शैलीतील लूक साकारला आहे. तर गौतमी पाटील नऊवारी साडीत पारंपरिक अंदाजात दिसत आहे. या नव्या जोडीला प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

पोस्ट शेअर करताना गौतमीने, “दादांचं सुपरहिट गाणं ‘हिल पोरी हिला’ एका नव्या ढंगात… आणि महाराष्ट्राचे लाडके भाऊ कदम यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली,” असे कॅप्शन दिले आहे.

गौतमी पाटीलने यापूर्वी ‘सरकार तुम्ही केलंय मार्केट जाम’, ‘कृष्ण मुरारी’, ‘रुपेरी वाळूत’ यांसारख्या अनेक लोकप्रिय गाण्यांमध्ये काम केले आहे. याशिवाय ती ‘देवमाणूस’ मालिकेतही झळकली होती. आता तिच्या नव्या गाण्याची चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!