उरुळीकांचन विषारी दारू कनेक्शन! पोलीस निरीक्षक सचिन वांगडेंची उचलबांगडी; विजयमाला पवार यांच्याकडे उरुळी कांचनची सूत्रे..

उरुळी कांचन : पुणे व पिंपरी-चिंचवड शहरात खळबळ उडवून देणाऱ्या विषारी हातभट्टी दारूकांड पडसाद उरुळीकांचन पोलिस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांवर शेकले असून हातभट्टी किंग राजू प्रजापती याच्याशी अर्थिक हितसंबंध समोर आलेल्या दोन पोलिस कर्मचाऱ्याच्या निलंबनानंतर उरुळीकांचन पोलिस ठाण्याचे प्रभारी पोलिस निरीक्षक सचिन वांगडे यांची तडकाफडकी उचलबांगडी करण्यात आली असून त्यांच्या पदाची सूत्रे पोलीस निरीक्षक विजयमाला पवार यांच्याकडे सोपवून त्यांची मुख्यालयात बदली करण्यात आली आहे.

विषारी दारू माफियाशी थेट कनेक्शन आढळून आल्यानंतर पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल यांनी उरुळी कांचन पोलीस ठाण्याच्या एकंदरीत कारभाराने आता प्रभारी अधिकारी सचिन वांगडे यांची सोमवार (दि.१) रोजी ठाण्याची सूत्रे काढून घेण्यात आली आहेत. त्यांची तडकाफडकी पोलीस मुख्यालयात (कंट्रोल) बदली करण्यात आली असून, त्यांच्या जागी धडक कामगिरीसाठी ओळखल्या जाणाऱ्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयमाला पवारयांची नियुक्ती करण्यात आली आहे.
उरुळीकांचन येथील हातभट्टी दारुचे कनेक्शन थेट पोलिसांच्या आर्शिवादाने चालू असल्याची पोलखोल समोर आल्यानंतर अप्पर बारामती अधिक्षकांकडून झालेल्या तपासात हे कनेक्शन उघड झाल्यानंतर कर्मचारी अजित काळे व कर्मचाऱ्यांनंतर पोलिस निरीक्षक सचिन वांगडे यांची उचलबांगडी केली आहे.

जिल्हा पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल यांनी दिलेल्या तोंडी आदेशानुसार, पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या मुख्यालयात कार्यरत असलेल्या विजयमाला पवार यांची उरुळी कांचन पोलीस ठाण्याच्या प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली. आदेश मिळताच पवार यांनी आज, सोमवारी (दि. १) तातडीने उरुळी कांचन पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारला असून आपल्या कामाला सुरुवात केली आहे.
