बारामतीत इतिहास घडला! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडीत काढले; तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय..

बारामती : महाराष्ट्राच्या राजकारणातील अत्यंत लक्षवेधी ठरलेल्या बारामती विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला असून, महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांनी दणदणीत आणि ऐतिहासिक विजय मिळवला आहे.

या निवडणुकीत सुनेत्रा पवार यांनी केवळ विजयच नव्हे, तर प्रचंड मताधिक्य मिळवत नवा विक्रमही प्रस्थापित केला आहे. बारामती हा पवार कुटुंबाचा पारंपरिक बालेकिल्ला मानला जातो आणि याच मतदारसंघात मिळालेल्या या मोठ्या विजयामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
ताज्या निकालानुसार, सुनेत्रा पवार यांनी तब्बल 2,18,930 मतांच्या प्रचंड फरकाने विजय मिळवत प्रतिस्पर्ध्यांना मोठा धक्का दिला आहे. याआधीचा मताधिक्याचा विक्रमही त्यांनी मागे टाकला असून, हा निकाल पोटनिवडणुकीच्या इतिहासात महत्त्वाचा मानला जात आहे.

दरम्यान, दुसरीकडे राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीतही निकाल जाहीर झाला आहे. माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर त्यांच्या जागेवर उभे असलेले अक्षय कर्डिले यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला आहे. वडिलांचा राजकीय वारसा पुढे नेत अक्षय कर्डिले यांनी राहुरीत भाजपचा झेंडा पुन्हा फडकावला आहे.
