बारावी बोर्डाचा निकाल काही तासांत जाहीर; कधी, कुठे आणि कसा पाहाल? जाणून घ्या सविस्तर


पुणे : मागील दोन ते अडीच महिन्यांपासून बारावीच्या निकालाची आतुरतेने वाट पाहणाऱ्या विद्यार्थी आणि पालकांसाठी अखेर आनंदाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांनी बारावी (HSC) परीक्षेच्या निकालाची तारीख अधिकृतपणे जाहीर केली आहे.

आज, २ मे २०२६ रोजी दुपारी १ वाजता ऑनलाईन पद्धतीने निकाल जाहीर केला जाणार आहे. त्याआधी सकाळी ११ वाजता पुणे येथील बोर्ड कार्यालयातून पत्रकार परिषद घेऊन निकालाबाबत सविस्तर माहिती दिली जाणार आहे.

विद्यार्थ्यांना त्यांचा वैयक्तिक निकाल आणि विषयानिहाय गुण दुपारी १ वाजल्यापासून mahresult.nic.in, mahahsscboard.in, hscresult.mkcl.org आणि results.digilocker.gov.in या अधिकृत संकेतस्थळांवर पाहता येणार आहेत. निकालानंतर विद्यार्थ्यांना ऑनलाईन गुणपत्रिका डाउनलोड करता येणार असून, पुढील प्रवेश प्रक्रियेसाठी ती अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.

यंदा सुमारे १४ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली आहे. निकालानंतर गुणांबाबत शंका असल्यास विद्यार्थ्यांना ३ मे ते १७ मे २०२६ दरम्यान ऑनलाईन पद्धतीने गुणपडताळणीसाठी अर्ज करता येणार आहे.

पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज करण्यापूर्वी उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे आवश्यक असून, ती मिळाल्यानंतर ५ दिवसांच्या आत अर्ज करणे बंधनकारक आहे. अर्जाचे शुल्क डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, UPI किंवा नेट बँकिंगद्वारे भरता येणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!