पुणे शहरात ‘या’ ठिकाणी गुरुवारी पाणीपुरवठा बंद..

पुणे : गुरुवारी वडगाव जलकेंद्राच्या अंतर्गत येणाऱ्या भागाचा पाणी पुरवठा सकाळी ९ ते सायंकाळी ५ या काळात बंद असणार आहे. याठिकाणी महावितरण कंपनीकडून २२ केव्ही वहन क्षमता असणाऱ्या विद्युत वाहिनीचे काम केले जाणार आहे.

यामुळे हिंगणे, आनंदनगर, वडगाव, धायरी, आंबेगाव पठार, दत्तनगर, धनकवडी, कात्रज भारती विद्यापीठ परिसर, कोंढवा बुद्रूक, आंबेगाव खुर्द, येवलेवाडी, सहकारनगर भाग २, आंबेडकरनगर, टिळेकरनगर, दाते बस स्टॉप परिसर. याठिकाणी पाणी येणार नाही.
सायंकाळी पाच नंतर कमी दबाने पाणी पुरवठा सुरू होईल, अशी माहिती पाणी पुरवठा विभागाने दिली आहे. याबाबत माहिती देण्यात आली आहे.

दरम्यान, सध्या कडक उन्हाळा असला तरी अवकाळी पाऊस देखील पडत आहे. यामुळे वातावरणात अनेक बदल दिसून येत आहेत.
Views:
[jp_post_view]