उष्णतेचा कहर वाढला! लातूरमध्ये ९ महिन्यांच्या बाळाच्या मृत्यूचा संशय; उष्माघाताचे दोन बळी

लातूर: लातूर जिल्ह्यात वाढत्या तापमानामुळे उष्माघाताच्या घटनांमध्ये चिंताजनक वाढ होत आहे. औसा तालुक्यातील गोंद्री गावात नऊ महिन्यांच्या बाळाचा उष्माघाताने मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त केला जात असून या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

गेल्या काही दिवसांत तापमान ४० ते ४१ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचल्याने दुपारच्या वेळेत उष्णतेचा तीव्र फटका बसत आहे. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि शेतकरी वर्ग यांच्यावर याचा सर्वाधिक परिणाम होत असून आरोग्याचा धोका वाढला आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी औराद शहाजनी येथे ६० वर्षीय शेतकऱ्याचा उष्माघाताने मृत्यू झाला होता. त्यानंतर गोंद्रीतील बाळाच्या मृत्यूची घटना समोर आल्याने जिल्ह्यातील संशयित मृतांचा आकडा दोनवर पोहोचला आहे.

Views:
[jp_post_view]