अशोक खरात प्रकरणात धक्कादायक खुलासा! तरुणीवर 4 वेळा अत्याचार; सहाव्या गुन्ह्यात मोठं काय समोर आलं?


नाशिक : अशोक खरात या भोंदूबाबाला अटक होऊन महिन्याहून अधिक काळ लोटला असून, त्याच्याविरोधात आतापर्यंत १५ गुन्हे दाखल झाले आहेत. या सर्व प्रकरणांचा तपास विशेष तपास पथक कडून बारकाईने सुरू आहे.

खरातची सध्याची स्थिती अशी झाली आहे की, एका गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी संपताच लगेच दुसऱ्या गुन्ह्यात एसआयटीकडून त्याचा ताबा घेतला जात आहे.

गुरुवारी न्यायालयाने त्याला पाचव्या गुन्ह्यात १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. मात्र, त्यानंतर लगेचच एसआयटीने सहाव्या गुन्ह्यासाठी त्याचा ताबा घेतला. त्याला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले.

या वेळी सरकारी वकिलांनी न्यायालयासमोर धक्कादायक बाबी मांडल्या. दैवी चमत्काराचा खोटा दावा करत आणि वैयक्तिक समस्या दूर करण्याचे आमिष दाखवून खरातने एका तरुणीवर चार वेळा बलात्कार केल्याचा आरोप करण्यात आला. तसेच, गुंगीकारक औषध मिसळलेले पाणी पाजल्याचाही गंभीर आरोप आहे.

या प्रकरणाचा सखोल तपास करण्यासाठी, तसेच वापरलेल्या औषधाचा शोध घेण्यासाठी आणि धार्मिक विधींच्या नावाखाली झालेल्या आर्थिक फसवणुकीचा तपास करण्यासाठी पोलिसांनी कोठडीची मागणी केली होती. दरम्यान, आरोपीच्या वकिलांनी या मागणीला विरोध करत सर्व गुन्ह्यांचे स्वरूप सारखेच असल्याने पुन्हा पुन्हा कोठडी देण्याची गरज नसल्याचे सांगितले.

मात्र, दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत अशोक खरात याला सहाव्या गुन्ह्यात २६ एप्रिलपर्यंत तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, या कालावधीत त्याच्या आणखी काही गैरकृत्यांचा उलगडा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!