सर्वात मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी रात्री 8.30 वाजता संबोधन करणार, नवी घोषणा करणार? महत्वाची माहिती समोर..

नवी दिल्ली : देशाची राजधानी नवी दिल्लीत सध्या अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत. असे असताना आता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज रात्री 8.30 वाजता देशवासियांना संबोधित करणार आहेत. महिला आरक्षण विधेयक , तसेच मतदारसंघ पुनर्रचना विधेयकावर ते मत मांडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यामुळे ते काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

याबाबत माहिती अशी की, महिला आरक्षण आणि मतदारसंघ पुनर्रचनेसाठीचं 131 वं घटनादुरुस्ती विधेयक लोकसभेत एकमतानं नामंजूर झालं. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक संपन्न झाली. विरोधी पक्षांना महिला आरक्षण विधेयक रोखल्याची किंमत मोजावी लागणार, असं मोठं वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केल्याची माहिती आहे.
तसेच मोदींनी महिला आरक्षण विधेयक रोखून विरोधकांनी खूप मोठी चूक केली. विरोधकांनी आमचा पराभव केला नाही तर महिलांच्या हक्कांचा विरोध केला. विरोधकांची महिलांप्रती विचारसरणी ही नकारात्मक आहे. हा संदेश देशातील प्रत्येक गावात पोहोचवला पाहिजे, असं नरेंद्र मोदी म्हणाले. विरोधी पक्ष आता आपली भूमिका योग्य ठरवण्याचा आणि लपवण्याचा प्रयत्न करत आहेत, असे म्हटले.

महिला आरक्षण आणि मतदारसंघ पुनर्रचनेसाठीचं 131 वे घटनादुरुस्ती विधेयक लोकसभेत नामंजूर झालं आहे. यामुळे मोदी सरकारला धक्का बसला आहे. विधेयकाच्या बाजूनं 298 तर विधेयकाच्या विरोधात 230 मतं पडली. यामुळे लोकसभेत विधेयकाच्या बाजूनं सभागृहात दोन तृतीयांश बहुमत मिळवण्यात मोदी सरकारला अपयश आलं.

131 व्या घटनादुरुस्ती विधेयकाला मंजूर करुन घेण्यात अपयश आल्यानंतर केंद्र सरकारनं इतर 2 विधेयकं पटलावर मांडण्याआधीच मागे घेतली. महिला आरक्षण विधेयक आणि मतदारसंघ पुनर्रचना विधेयकावरुन सध्या देशाच्या लोकसभेत जोरदार घमासान सुरु आहे. यामुळे आज मोदी नेमकं काय बोलणार हे लवकरच समजेल.