अजितदादांच्या विमानाची आग विझवणाऱ्या महिलांची रोहित पवार यांनी घेतली भेट, घटनास्थळी जाऊन म्हणाले…


बारामती : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे काही दिवसांपूर्वी विमान अपघातात निधन झाले. यानंतर आमदार रोहित पवार यांनी याबाबत चौकशी करण्याची मागणी लावून धरली आहे. यामुळे हे प्रकरण चर्चेत आले. अजित पवार यांना न्याय मिळाला पाहिजे अशी आमची भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

याबाबत आमदार रोहित पवार म्हणाले, बारामती विमानतळाच्या बाजूला जिथं दुर्दैवी अपघातामुळं अजितदादांनी अखेरचा श्वास घेतला त्या जागी आजही दररोज अजितदादांवर प्रेम करणारे राज्यभरातील लोक येऊन अजितदादांना श्रद्धांजली वाहतात.

प्रचार दौऱ्यात असताना आज पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसोबत या जागी भेट देऊन अजितदादांच्या स्मृतीला अभिवादन केलं तसंच रामसेतू बांधताना ज्याप्रमाणे खारीनेही आपला वाटा उचलला होता त्याप्रमाणेच अजितदादांच्या अपघातग्रस्त विमानाची आग विझवण्याचा ज्यांनी प्रयत्न केला त्या स्थानिक महिला भगिनींचा यावेळी कृतज्ञतापूर्वक सत्कार केला.

याप्रसंगी २८ जानेवारीचा तो आघात कदापि विसरणं शक्य नसल्याने त्यामुळं मनावर झालेली खोलवरची जखम पुन्हा चिघळली. अशी पोस्ट रोहित पवार यांनी केली आहे. यावेळी राजेंद्र पवार, सई पवार देखील उपस्थित होत्या. सध्या बारामती विधानसभा पोटनिवडणुक लागली आहे.

यासाठी आमदार रोहित पवार बारामतीत तळ ठोकून आहेत. अनेक गावांत जाऊन त्यांनी प्रचार सुरू केला असून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना मतदान करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. प्रचार सुरू असतानाच त्यांनी अजित पवार यांचे विमान ज्याठिकाणी कोसळले तेथे जाऊन दादांना श्रद्धांजली अर्पण केली.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!