मोठी बातमी! पुढच्या तीन दिवसात महत्वाची राजकीय घडामोड, बडा नेता शरद पवारांची साथ सोडणार? महत्वाची माहिती समोर…


मुंबई : राज्याच्या राजकारणात सध्या अनेक घडामोडी घडताना दिसत आहे. तसेच पुढच्या तीन दिवसात भाजपकडून शरद पवार यांना राजकीय धक्का बसू शकतो. अहिल्यानगर जिल्ह्यात एक मोठी राजकीय घडामोड घडू शकतो. सध्या अहिल्यानगरच्या राहुल विधानसभा पोटनिवडणुकीसाठी प्रचार जोरात सुरु आहे.

आमदार शिवाजीराव कार्डिले यांच्या निधनामुळे राहुरीमध्ये पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. या पार्श्वभूमीवर भाजपने त्यांचे सुपुत्र अक्षय कार्डिले यांना उमेदवारी देत सहानुभूतीची लाट साधण्याचा प्रयत्न केला आहे.

दरम्यान, शरद पवार गटाकडून प्राजक्त तनपुरे निवडणूक लढवतील, अशी जोरदार चर्चा होती. मात्र, देवेंद्र फडणवीस आणि रवींद्र चव्हाण यांची इच्छा लक्षात घेता प्राजक्त तनपुरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला नाही. त्यामुळे शरद पवार गटाने अखेर राहुरी मतदारसंघातून गोविंद मोकाटे यांना उमेदवारी देत निवडणुकीत नवा चेहरा पुढे केला आहे.

आता शरद पवार पक्षाचे नेते आणि माजी मंत्री प्राजक्त तनपुरे 20 तारखेला भूमिका जाहीर करणार अशी माहिती आहे. कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन प्राजक्त तनपुरे निर्णय घेणार असं समजतय. तनपुरे भाजपा प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.

त्यामुळे वीस तारखेला कोणता निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष. ‘माझी भूमिका मी सहा तारखेला स्पष्ट केली, मात्र आमचे काही कार्यकर्ते नाराज, त्यामुळे मेळावा घेऊन भूमिका स्पष्ट करणार’ असं तनपुरे म्हणाले.

राहुरी पोटनिवडणुकीत उमेदवारीसाठी इच्छुक असताना भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखेंनी घेतली होती भेट. भेटीनंतर अर्ज न भरण्याचा घेतला तनपुरे यांनी निर्णय घेतला होता. आता अक्षय कर्डिले यांना थेट पाठिंबा देणारा का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

प्राजक्त तनपुरे यांच्या संभाव्य भाजप प्रवेशावर यापूर्वी माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी टोलेबाजी केली होती. मात्र आता त्याच विखे यांनी तनपुरे यांची उघडपणे स्तुती करत भूमिका बदलल्याचे दिसून येत आहे. राहुरी तालुक्यातील नगरपालिका, बाजार समिती तसेच साखर कारखान्यासारख्या महत्त्वाच्या संस्थांवर प्राजक्त तनपुरे यांचा प्रभाव असल्याचे मानले जाते.

स्थानिक पातळीवर तनपुरे कुटुंबाला मोठा मान-सन्मान असून त्यांना पाठिंबा देणारा मोठा वर्ग आहे. यामुळेच, जर प्राजक्त तनपुरे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला, तर राहुरीसह परिसरात भाजपची ताकद लक्षणीयरीत्या वाढू शकते, अशी राजकीय वर्तुळात चर्चा रंगत आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!