खासदार सुप्रिया सुळेंच्या होणाऱ्या जावयाच्या कंपनीसोबत राज्य सरकारचा मोठा करार, साडेपाच हजार कोटींची गुंतवणूक..

मुंबई : प्रसिद्ध उद्योजक आणि शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांचे भावी जावई सारंग लखानी यांच्या नोव्हँरियन एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने राज्य सरकारसोबत एका महत्त्वाच्या प्रकल्पासाठी करार केला आहे. यामुळे याची सध्या चर्चा सुरु झाली आहे. हा करार 5 हजार 760 कोटी रुपयांचा आहे. लखानी घराणे हे गेल्या अनेक वर्षांपासून उद्योग क्षेत्रात आहे.

याबाबत माहिती अशी की, राज्यातील वीज निर्मितीची क्षमता मोठ्या प्रमाणात वाढविण्यात येणार असून उदंचन जलविद्युत प्रकल्पातून एक लाख मेगावॅट वीज क्षमता निर्माण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले जात आहेत. या करारामुळे आता राज्यातील वीज निर्मितीची क्षमता मोठ्या प्रमाणात वाढणार असून उदंचन जलविद्युत प्रकल्पातून 1 लाख मेगावॅट वीज क्षमता निर्मितीसाठी प्रयत्न केले जाणार आहेत.
यापूर्वीही त्यांनी महाराष्ट्र सरकारसोबत अनेक प्रकल्पांसाठी भागीदारी केली आहे. यावेळी महाराष्ट्र हे उदंचन जलविद्युत प्रकल्प माध्यमातून सर्वात जास्त ऊर्जा निर्मितीची क्षमता असणारे राज्य ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. हा नवा करार पार पडत असताना महाराष्ट्र हे उदंचन जलविद्युत प्रकल्पाच्या माध्यमातून सर्वात जास्त ऊर्जा निर्मितीची क्षमता असणारे राज्य असणार आहे.

दरम्यान, या प्रकल्पाद्वारे सुमारे 5 हजार 760 कोटींची गुंतवुणूक होणार असून यामधून सुमारे 1 हजार 500 लोकांना रोजगारनिर्मिती होणार आहे. या कराराअंतर्गत नोव्हँरियन एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडून रानवाडी तालुका महाड जिल्हा रायगड येथे प्रकल्प उभारणी करण्यात येणार आहे. या कराराअंतर्गत नोव्हॅरियन एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडून रानवाडी रायगड येथे प्रकल्प उभारणी होणार आहे.

तसेच यामध्ये या प्रकल्पद्वारे १२०० मेगावॅट वीज निर्मिती; या प्रकल्पासाठी सुमारे ₹५,७६० कोटींची गुंतवणूक; यामधून सुमारे १,५०० रोजगारनिर्मिती केली जाणार आहे. उदंचन जलविद्युत निर्मिती क्षेत्रातील ५६ वा सामंजस्य करार केला जाणार आहे. प्रकल्पातून 1 लाख मेगावॅट वीज क्षमता निर्मितीसाठी प्रयत्न केले जाणार आहेत