पुण्यात खाकीला डाग! विनयभंगाच्या प्रकरणात प्राचार्याकडून उकळले 7 लाख, तीन पोलीस अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल


पुणे : पुणे शहर पोलीस दलाची मान शरमेने खाली घालवणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका प्राचार्य महिलेला विनयभंगाच्या प्रकरणात अटकेची भीती दाखवून तीन पोलीस अधिकाऱ्यांनी तब्बल सात लाख उकळले असल्याची माहिती समोर आली आहे.या प्रकरणी संबंधित पोलिसांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे.

काय आहे प्रकरण?

पुण्यातील एका महाविद्यालयाचे प्राचार्य यांच्याकडे विद्यार्थिनीचे महाविद्यालय प्रवेशावेळी जमा केलेले कागदपत्र होते. याचाच फायदा घेऊन तीन पोलीस अधिकारी महाविद्यालयात जाऊन ती प्रिंट प्राचार्यासमोर ठेवत म्हणाले,तुम्ही एका विद्यार्थिनीला मेट्रो स्टेशनवर बंदुकीचा धाक दाखवून तिला गाडीमध्ये ओढल असल्याची तुमच्या विरोधात तक्रार आली आहे. आणि ही मुलगी अठरा वर्षाच्या कमी वयाच्या असल्याने तुमच्यावर गुन्हा दाखल होऊन तुम्हाला अटक होऊ शकते.

त्यानंतर त्यांनी दहा लाख रुपयांची मागणी करत प्राचार्यांना धमकावून सात लाख रुपये पर्यंत आणले. फिर्यादी यांनी ७ लाख रुपये मुलीच्या शिक्षणासाठी देण्यास तयार झाले आणि रक्कम सुद्धा दिली. यावर्षीच्या ८ मार्च रोजी, पुणे पोलिसांच्या दरोडा व वाहन चोरी पथकाने प्राचार्यांना बोलावून संबंधित मुलीने बडे आणि हिंगे यांनी शिवाजीनगर पोलीस स्टेशन येथे त्यांचा विरुद्ध दिलेला तक्रारी अर्ज दाखविला आणि हा सगळा प्रकार समोर आला.

याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या पोलिसांमध्ये पोलीस उपनिरीक्षक अजित बडे, पोलीस कर्मचारी सुदाम तायडे आणि दामिनी पथकातील सोनाली हिंगे यांचा समावेश आहे.दरम्यान या तिघांवर काय कारवाई होणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!