बारामती पोटनिवडणुकीत ट्विस्ट ; आखाड्यातून 6 अपक्ष उमेदवारांची माघार, कुणाचे अर्ज मागे?


पुणे: महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर बारामती विधानसभा पोटनिवडणूक होत आहे.या निवडणुकीसाठी त्यांच्या पत्नी आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार रिंगणात उतरल्या आहेत. या निवडणुकीत एकूण 53 उमेदवार रिंगणात होते. मात्र आता यातील 6 अपक्ष उमेदवारांनी माघार घेतली असल्याची माहिती समोर आली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, बारामती पोटनिवडणूक लढवण्यासाठी एकूण 53 जणांनी आपले नामांकन दाखल केले होते. त्यापैकी आज 6 जणांनी अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेतला. यामध्ये विलास होळकर, माऊली कांबळे, रझाक मुलाणी, राहुल थोरात, अमोल कोकरे आणि अशोक खामगळ अशा सहा जणांचा समावेश आहे. आता या अंतिम मुदतीनंतर नेमके किती उमेदवार रिंगणात कायम राहतात आणि प्रत्यक्ष लढत कोणाकोणामध्ये होणार, हे स्पष्ट होणार आहे.

विशेष म्हणजे बारामती फोटो निवडणूक बिनविरोध व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात असताना काँग्रेसने उमेदवार रिंगणात उतरवला आहे. ही निवडणूक लढवू नये, अशी भूमिका काँग्रेसच्या एका गटाची आहे. अजित पवारांचं निधन झालं असताना तिथे उमेदवारी देणं राजकीय संकेतांना धरून नाही. त्यामुळे काँग्रेसनं इथून माघार घ्यावी, असा पवित्रा महाराष्ट्र काँग्रेसच्या काही वरिष्ठ नेत्यांनी घेतल्याची माहिती आहे

दरम्यान आज शेवटच्या दिवशी काँग्रेसचा उमेदवार निवडणुकीतून माघार घेणार का? उर्वरित 47 पैकी किती उमेदवार माघार घेणार? किती कायम राहणार? हे चित्र आज स्पष्ट होणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!