मोठी बातमी! रुपाली चाकणकर आणि भोंदू खरात प्रकरणात थेट अंजली दमानियांकडून धक्कादायक पुरावा समोर…

मुंबई : भोंदू अशोक खरात प्रकरणात एका मागावर एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. प्रकरणात अनेक नेत्यांचे नाव जोडले जात असल्याच्या चर्चा सुरू आहेत. राज्यातील काही महत्वाच्या नेत्यांशी अशोक खरातचे जवळचे संबंध असल्याचे संकेत मिळत आहेत, तर यादरम्यान काही फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी या प्रकरणावर खळबळ उडवणारा खुलासा केला आहे. त्यांनी सांगितले की, एका अनोळखी व्यक्तीकडून प्राप्त झालेल्या सीडीआरमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अशोक खरात यांचे फोन कॉल असल्याचे दाखल आहेत. अंजली दमानियाच्या या दाव्यानंतर राजकीय आणि सामाजिक स्तरावर मोठी खळबळ उडाली.
यावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले की, या प्रकरणात सविस्तर चौकशी केली जाणार आहे. त्यांनी सांगितले की, कोणत्याही व्यक्तीकडून दिलेली सीडीआर आपोआप सत्य नसते आणि सीडीआर देणाऱ्याची स्वतंत्र चौकशी होईल.

यावर पुन्हा एकदा अंजली दमानियाने आरोप करत म्हटले आहे की, काही लोकांना थेट त्यांच्या विरोधातही चौकशी करण्याचा इशारा देण्यात आला आहे. या आरोपांनी प्रकरणाच्या गंभीरतेत आणखी वाढ केली असून सामाजिक आणि राजकीय वातावरण तापलेले आहे.
संजय राऊत यांनीही स्पष्ट केले होते की, अंजली दमानिया कोणतेही रॉ एजंट नाहीत आणि त्यांच्याकडे सीडीआर येणे काहीतरी गैर नाही. या सर्व चर्चांवर प्रतिक्रिया देताना अंजली दमानियाने सांगितले की, तिला आधीच माहिती होती की, सीडीआर पुढे आणल्यानंतर तिच्यावर अशाप्रकारचे आरोप केले जातील.
तिने स्पष्ट केले की, तिने संपूर्ण तपास करून माहिती पुढे आणली असून, देवेंद्र फडणवीस किंवा उदय सामंत यांच्या कोणत्याही कॉलचा सीडीआरमध्ये उल्लेख नाही.
भागवत कराड, पंकजा मुंडे, धनंजय मुंडे एकही कॉल नाही. अब्दुल सत्तार, रामदास कदम, योगेश कदम, राधाकृष्ण विखे पाटील, सुषमा अंधारे, संजय राऊत, बच्चू कडू, राम कदम, प्रसाद लाड यापैकी एकाचाही कॉल नाही. यासोबतच अंजली दमानिया यांनी राज्यातील अनेक नेत्यांची नावे घेतली. मी सर्व नंबर तपासले आणि क्रॉस केले.
आम्ही लढतो तो विषयांवर फालतूचे राजकारण करत नाही. मिलिंद नार्वेकर यांचे नाव आले, त्यांचा 8 कॉल आहेत. मग तुम्ही मागणी केली, त्यांच्या कॉलची? काय बोलता तुम्ही अंधारे बाई?… मुळात लढायचे कोणाविरोधात खरात विरोधात.. मी जराशी माझ्याकडे आलेली माहिती दिली की, लगेचच वरखाली झाले. रूपाली चाकणकर, सुनील तटकरे यांचे किती फोन कॉल झाले हे सांगताना अंजली दमानिया दिल्या.
पुढे बोलताना अंजली दमानिया यांनी म्हटले की, माझ्याकडे आलेली माहिती फक्त मी दिली. माझ्याकडे जी माहिती आहे ती 1 एप्रिल 2026 ते 25 मार्च 2026 पर्यंतची आहे. शिवसेनेच्या शिंदेंचे 17 कॉल आलेत. संजय शिरसाट, मिलिंद नार्वेकर यांचेही मला कॉल मिळाले. यादरम्यान चाकणकरांचे खरात यांच्यासोबतच कॉल पुरावे, दमानिया यांनी दाखवले.