अशोक खरात प्रकरणात गौतमी पाटील आक्रमक; सरकारकडे केली मोठी मागणी, म्हणाली आता कठोर…

सोलापूर : नाशिकमध्ये अध्यात्माच्या आडून महिलांचे शोषण आणि कोट्यवधींची फसवणूक करणाऱ्या भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणाने सध्या मोठी खळबळ उडवली आहे. स्वतःला ‘कॅप्टन’ किंवा ‘अवतारी पुरुष’ म्हणवून घेणाऱ्या या भोंदूबाबाने अध्यात्माच्या नावाखाली अनेक महिलांचे शोषण केल्याचा तसेच लोकांकडून कोट्यवधी रुपये उकळल्याचा आरोप तपासातून समोर आला आहे.

या प्रकरणात पोलिसांनी अशोक खरातला अटक केली असून सध्या तो पोलीस कोठडीत आहे. या धक्कादायक घटनेनंतर समाजाच्या विविध स्तरांतून संताप व्यक्त होत आहे आणि प्रतिक्रिया उमटत आहेत. दरम्यान, प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील सोलापूरमधील खंडोबाची वाडी येथे एका कार्यक्रमानिमित्त उपस्थित असताना त्यांनीही या प्रकरणावर भाष्य करत समाजातील भोंदूगिरीवर कडक शब्दांत टीका केली.
सोलापूर जिल्ह्यातील खंडोबाची वाडी येथे श्री खंडोबा देवाच्या यात्रोत्सवानिमित्त गौतमी पाटीलच्या नृत्याचा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. तिच्या दमदार अदाकारीने उपस्थित प्रेक्षक अक्षरशः मंत्रमुग्ध झाले. महिलांसह नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावत कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. गौतमीने मंचावर एन्ट्री घेताच चाहत्यांनी जल्लोषात उभे राहून नृत्य करण्यास सुरुवात केली, त्यामुळे संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

यावेळी तिला भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणी विचारणा करण्यात आली. त्यावर तिने स्पष्ट शब्दात प्रतिक्रिया दिली. भोंदू बाबा अशोक खरातवर योग्य ती कारवाई झाली पाहिजे. योग्य ती कडक कारवाई झाली पाहिजे.
याकडे जास्त गांभीर्यपूर्वक लक्ष दिलं पाहिजे. यांसारख्या गोष्टी आपल्या देशात परत या गोष्टी घडल्या नाही पाहिजेत. यामुळे आताच यावर कडक कारवाई व्हायला हवी, असेही भोंदू बाबा अशोक खरात यांनी म्हटले.
भोंदू बाबा अशोक खरात याच्यावर कठोर कारवाई झालीच पाहिजे. अशा प्रकरणांकडे अत्यंत गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे. भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी प्रशासनाने ठोस पावले उचलली पाहिजेत. त्यामुळे या प्रकरणात तातडीने आणि कडक कारवाई होणे आवश्यक आहे, अशी ठाम प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली.