राज्यावर संकट कायम! आज मुसळधार पाऊस कोसळणारच, तब्बल ‘इतक्या’ जिल्ह्यात अलर्ट जारी..

पुणे : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली असून गारपीट आणि वादळी वाऱ्यामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे.त्यामध्येच आजही भारतीय हवामान विभागाने अत्यंत मोठा अंदाज वर्तवत मराठवाड्यासह विदर्भात पावसाचा इशारा दिला आहे.

भारतीय हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, आज विदर्भात आणि मराठवाड्यात पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. राज्यातील हवामानात आज चढउतार होताना दिसत आहे. काही भागात ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. गोदिंया, चंद्रपूर, नागपूर, भंडारा, नांदेड, परभणी, हिंगोली या जिल्ह्यांमध्ये आज पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
विजांचा कडकडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.मागील काही दिवसांपासून मराठवाड्यात अवकाळी पाऊस सतत हजेरी लावत आहे. त्यामध्येच आजही इशारा देण्यात आला. आज अनेक भागात उष्णता वाढण्याचाही अंदाज आहे.

या अवकाळी पावसाचा मोठा फटका थेटपणे शेती पिकांना बसला आहे. रब्बीच्या पिकाचे मोठे नुकसान झाले. अवकाळी पावसाचा अमरावती जिल्ह्याला मोठा फटका बसला आहे. जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यात कांदा पिकाचे मोठे नुकसान झाले. काढणीला आलेला कांदा पावसामुळे भिजला असल्याने शेतकऱ्यांच हजारो रुपयांचे नुकसान झालं आहे.