महाराष्ट्रात राजकीय भूकंप! उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचा रात्री उशिरा दिल्ली दौरा, पटेल- तटकरेंचं टेन्शन वाढलं?


पुणे : महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चांना जोर आला होता. त्यानंतर राष्ट्रवादीमध्ये सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार बुधवारी सायंकाळी एकट्याच दिल्ली दौऱ्यावर गेल्या असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्या या दौऱ्यामुळे प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांचे टेन्शन वाढल आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, अजित पवार यांच्या निधनानंतर 16 फेब्रुवारी रोजी प्रफुल्ल पटेल,सुनील तटकरे आणि ब्रिज मोहन श्रीवास्तव यांच्या सह्याचे एक पत्र निवडणूक आयोगाला देऊन पक्षांचे सर्व अधिकार प्रफुल्ल पटेल यांच्याकडे देण्याचा घाट घालण्यात आला होता असा आरोप करण्यात आला आहे. यानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी 10 मार्च रोजी निवडणूक आयोगाला पत्र लिहून तटकरे, प्रफुल्ल पटेलांनी पाठवलेले पत्र ग्राह्य धरू नका म्हणून सांगितलं होतं. या घडामोडीनंतर पक्षात बरेच वादंग झाले. असे असताना सुनेत्रा पवारांच्या या अचानक ठरलेल्या दिल्ली दोऱ्याने अनेकांचे टेन्शन वाढल आहे.

अजित पवार यांच्या पश्चात पहिल्यांदाच सुनेत्रा पवार एकट्याच दिल्लीला गेल्या आहेत.या पत्रावरुनच सुनेत्रा पवार आणि पटेल तटकरेचा दुरावा वाढल्याची चर्चा आहे. त्यामुळे आज सुनेत्रा पवार भाजपाच्या ज्येष्ठ नेत्यांच्या भेटीदरम्यान काय बोलणार आणि कोणती भूमिका घेणार हे महत्त्वाचं ठरणार आहे.

विशेष म्हणजे सुनिता पवारांच्या सोबत पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेलही नाहीत आणि सुनील तटकरेही नाहीत. आज पार्थ पवार दिल्लीलाही जाणार नाहीत. दिल्ली दौऱ्यात सुनेत्रा पवार मोठ्या नेत्या संदर्भात काय भूमिका घेतात? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागल आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!